राणीच्या बागेत बिबट्या, तरसाची जोडी होणार दाखल

राणी बागेत वेगवेगळे प्राणी पाहायला जाणाऱ्या मुंबईकर व पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

SHARE

राणी बागेत वेगवेगळे प्राणी पाहायला जाणाऱ्या मुंबईकर व पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात पुढील महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बिबट्या आणि तरसाच्या प्रत्येकी एका जोडीचं आगमन होणार आहे. म्हैसूर प्राणिसंग्रहालयाकडून राणीच्या बागेला हे प्राणी भेट म्हणून देण्यात येणार आहेत.

नूतनीकरणाचा प्रकल्प

या नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी सध्या प्राणिसंग्रहालयात जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईमधील पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या राणी बागेच्या नूतनीकरणाचा प्रकल्प महापालिकेनं हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशविदेशातील वन्यप्राणी प्राणिसंग्रहालयात आणण्यात येणार आहेत. या प्राण्यांसाठी पिंजरे उभारण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

महसुलात लक्षणीय वाढ

राणी बागेत दाखल झालेलं हम्बोल्ट पेंग्विन पर्यटकांचे आकर्षण बनलं आहे. त्यामुळे राणी बागेच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे. तसंच, गेल्या काही महिन्यांमध्ये राणीच्या बागेत मंगलोर प्राणिसंग्रहालयामधील बिबळ्या, कोल्हा, मोराची जोडी ही सूरत प्राणिसंग्रहालयामधील अस्वल आदी राणी बागेत दाखल झाले आहेत.हेही वाचा -

मुंबईतील मॉलच्या वाहनतळांकडे वाहनचालकांची पाठ

४ वर्षांत बेस्ट बसच्या फेऱ्यांत 'इतकी' घटसंबंधित विषय
ताज्या बातम्या