मागील अनेक वर्ष आर्थिक तोट्यामुळं बेस्टचं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं आहे. बेस्ट उपक्रमावर असलेल्या कर्जामुळं कामगारांचं वेतनही वेळेत मिळत नव्हतं. अस असताना, मागील ४ वर्षात १६ हजार फेऱ्या कमी झाल्या आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी दररोज ५९ हजारापर्यंत होणाऱ्या बस फेऱ्या थेट ४३ हजारावर आल्या असून तब्बल १६ हजार फेऱ्या कमी झाल्या आहेत.
कमी मनुष्यबळ, सुरू असलेली विविध विकासकामं, वाहतूक कोंडी या कारणांमुळं गेल्या ४ वर्षांत मुंबईत बेस्टची धाव कमी होत चालली आहे. या सर्व कारणांमुळं बेस्टचं वाहतूक आर्थिक नुकसान ३ टक्क्यांवरून थेट ११ टक्क्यांवर पोहोचलं आहे.
बेस्ट उपक्रमाकडून कमी होणाऱ्या बस गाड्या, फेऱ्या, त्याची कारणं याचा आढावा घेण्यात आला. यामधून बेस्टची धाव कमी होत असल्याचं निदर्शनास आलं असून, बेस्टनं काही वर्षांपूर्वी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित बसगाड्याही दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र निकृष्ट दर्जा, अपुरी देखभाल, वाहतूक कोंडीत बंद होणाऱ्या बस यामुळं कालांतरानं या बसगाड्या बेस्टसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत.
विविध
विकासकामांमुळं तर बसगाड्यांचे
मार्गही वळवण्यात आले आहेत.
या
कारणांमुळं एकूणच बेस्टच्या
वाहतूक आर्थिक नुकसानीत वाढ
झाली.
तसंच,
ही
११ टक्क्यांवर पोहोचल्याची
माहिती मिळते.
गेल्या
४ वर्षांत दिवसाला होणाऱ्या
फेऱ्यांत,
किलोमीटरमध्ये
आणि उत्पन्नातही घट होत गेली
आहे.
२०१५-१६ मध्ये दररोज ५९ हजार ६३ फेऱ्या होत होत्या. त्यात घट होऊन आता ४३ हजापर्यंत फेऱ्या होतात. वाहतुकीतून प्रत्येक दिवशी मिळणारं उत्पन्नही ३ कोटी ७२ लाख रुपयांवरून थेट १ कोटी ९० लाखांपर्यंत पोहोचलं. यामध्ये प्रत्येक बसमागं मिळणारं उत्पन्न २०१५-१६ साली १० हजार ७५३ एवढं असतानाच ते ६ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा -
मुंबईच्या रस्त्यावर लवकरच धावणार ४ चाकी रिक्षा
कांद्याचे दर लवकरच १५० रुपये किलो