Advertisement

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये गॅस गळतीच्या तक्रारी

शहरातल्या अनेक भागात ‘गॅस गळती’च्या तक्रारी मुंबईकरांनी केल्या आहेत.

मुंबईतल्या 'या' भागांमध्ये गॅस गळतीच्या तक्रारी
SHARES
Advertisement

शहरातल्या अनेक भागात ‘गॅस गळती’च्या तक्रारी मुंबईकरांनी केल्या आहेत. पालिकेनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याची पुष्टी दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी नमूद केलं आहे की, चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई इथल्या रहिवाशांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत.

पालिकेनं ट्विटमध्ये नमूद केलं आहे की, आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. आमच्याकडे चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई इथल्या रहिवाशांकडून संशयित गॅस गळती होण्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. अग्निशमन दल तपासत आहे आणि आम्ही लवकरच वस्तुस्थिती अद्यतनित करू.

यासर्व प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील लक्ष्य घातलं आहे. यासंदर्भात आदित्य यांनी ट्विट केलं. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, चेंबूर आणि चांदिवली इथल्या नागरिकांनी गॅस गळती झाल्याबद्दल मला तक्रारी आल्या आहेत. चेंबूर आणि चांदिवलीमध्ये गॅसचा वास येत असल्याची तक्रार आली. @Mybmc आपत्ती नियंत्रण कक्ष गॅस गळतीचा मुख्य स्त्रोत शोधत आहे. मुंबई फायर ब्रिगेड कार्यरत आहे.

यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी आणखी एक ट्विट केलं. त्यात ते म्हणाले की, अग्निशमन दल आपलं काम करत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरू नये, आपल्या घरीच रहावं. तुमच्या घराच्या खिडक्या लावून घ्या. @mybmc या परिस्थितीवर सक्रियपणे देखरेख ठेवत आहे.

पालिकेचं म्हणणं आहे की, ते यावर लक्ष्य ठेवून आहेत. ट्विटरवर अनेक युजर्स यावर चिंता व्यक्त करत आहेत. एका युजरनं गॅसचा वास येत असल्याची तक्रार केली आहे आणि विचारलं की, हे धोकादायक आहे का?

यावर पालिकेनं उत्तर दिलं की, कृपया घाबरू नका. परिस्थितीची काळजी घेण्यासाठी १३ अग्निशामक यंत्रणा खबरदारी म्हणून सक्रिय करण्यात आल्या आहेत. कोणालाही गॅसच्या गळतीमुळे त्रास होत असेल तर आपल्या तोंडावर ओले टॉवेल किंवा कपडा बांधा.

खासदार मनोज कोटक यांनीही ट्विटरवर या गॅस गळतीची माहिती देण्यासाठी अग्निशामक दलाच्या १३ गाड्या पाठवल्या असल्याची माहिती दिली.

यासंदर्भात अजून माहिती मिळाल्यास वाचकांना लवकरच देण्यात येईल. या बातमीवर सध्या आम्ही काम करत आहोत.
संबंधित विषय
Advertisement