Advertisement

एमएमआरसीविरोधात तक्रार दाखल


एमएमआरसीविरोधात तक्रार दाखल
SHARES

मुंबई - राष्ट्रीय हरित लवादाची बांधकामास स्थगिती असताना आणि बांधकामासाठी कोणतीही परवानगी नसताना पोलीस बळाचा वापर करत मनमानीपणे मेट्रो-3 चे काम सुरू करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला अखेर पर्यावरण प्रेमींनी दणका दिला आहे.

शनिवारी वनशक्ती, सेव्ह ट्री, सेव्ह आरे आणि आरेवासियांनी एकत्र येत आरे पोलीस ठाण्यात एमएमआरसीविरोधात तक्रार दाखल करत एमएमआरसीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याची माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे.

आम्ही आता पोलीस तक्रार दाखल केली असून 9 एप्रिलला हरित लवादाकडे आणि 10 एप्रिलला उच्च न्यायालयात सुनावणी आहे. या वेळी ही बाब न्यायालयासमोर आम्ही मांडणार आहोत 

- झोरू बाथेना, सेव्ह ट्री

गुरूवारी सकाळी एमएमआरसीने आरेतील युनिट 19 मध्ये जबरदस्तीने पोलिसांच्या फौजफाट्यात माती परिक्षणाचे काम केले. लवादाचा अवमान करत, कायद्याला न जुमानता काम करणाऱ्या एमएमआरसीविरोधात पर्यावरण प्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या धर्तीवर शनिवारी पर्यावरण प्रेमींनी आपला मोर्चा थेट युनिट 19 कडे वळवला. एमएमआरसीच्या या बेकायदा कृत्याचा निषेध करत आरे पोलीस ठाण्यात एमएमआरसी आणि कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा