Advertisement

'खड्डे अपघाताला संबंधित अभियंताच दोषी', नगरसेवकांचा आरोप


'खड्डे अपघाताला संबंधित अभियंताच दोषी', नगरसेवकांचा आरोप
SHARES

रस्त्यांवरील खड्डयांवरून मुंबई महापालिकेला टार्गेट केलं जात असतानाच भाजपा नगरसेविकेनं महापालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांवर खड्डयांमुळे अपघात झाल्यास त्याला संबंधित रस्ते अभियंताच जबाबदार ठरवून त्याच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


व्हावी फौजदारी कारवाई

इमारत बांधकामामध्ये एखाद्या कमी दर्जाच्या इमारतींचे बांधकाम केल्यानंतर त्या इमारतीलचा भाग कोसळल्यास त्याठिकाणी असलेल्या विकासक तथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातात, त्याचधर्तीवर रस्ते संबंधित खड्डयांमुळे अपघात झाल्यास संबंधित रस्ते अभियंता याला जबाबदार धरून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपा नगरसेविका संगीता ज्ञानमूर्ती शर्मा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.


बंधनकारक जबाबदारी

वाहनचालक आणि पादचाऱ्यांना चांगले व खड्डेमुक्त तसेच दर्जेदार रस्ते हे महापालिकेचं बंधनकारक कर्तव्य आहे. परंतु महापालिकेच्या ताब्यातील अनेक रस्त्यांची पावसाळ्यात अवस्था ठिकाणी दयनीय झालेली असते. यासर्व रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याकरता महापालिकेच्यावतीनं विविध योजना राबवल्या जातात. या रस्त्यांची  कामांसाठी प्रत्येक विभागासाठी प्रमुख अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. म्हणून रस्त्यांवरचे खड्डे दुरुस्ती करणे ही त्या अधिकाऱ्यांची बंधनकारक जबाबदारी असते. 


अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच हलगर्जीपणामुळे रस्ते खड्डेमय होतात. पावसाळ्यात ते खड्डे नागरिकांना त्रासदायक ठरतात. पावसाळ्यात खड्डे न बुजवल्यामुळे वाहनांचे बऱ्याच ठिकाणी अपघातही होतात. प्रसंगी त्यांना प्राणही गमवावा लागतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.



हेही वाचा-

मुंबईतील खड्ड्यांची गिनीज बुकमध्ये नोंद ?

खड्ड्यांमुळं जीव जात असताना मनसे गप्प बसणार नाही - राज ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा