
एसटी महामंडळ (msrtc) सवलतींसाठी 1 ऑगस्टपासून नॅशनल कॉमन मोबिलीटी कार्ड म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करणार आहे.
या नवा नियम लागू झाल्यावर सर्वप्रथम महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने हा नियम सवलती मिळणाऱ्या इतर लाभार्थ्यांनाही लागू होईल.
गुरुवारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांनी याबद्दल घोषणा केली.
नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि यंत्रणेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या विद्यार्थी, दिव्यांग प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पुरस्कार प्राप्त प्रवाशांसह सुमारे 35 वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती दिल्या जातात.
सध्या बनावट ओळखपत्रे, कागदपत्रे वापरून सवलती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. दिवसेंदिवस अशा घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे पडताळणीसाठी एक डिजिटल पद्धत परिवहन मंडळाला सुरु करण्याची गरज भासली आहे.
महाराष्ट्रात (maharashtra) सध्या 51 लाखांहून अधिक प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यापैकी तब्बल 25 लाख कार्ड ॲक्टीव्हेट झाले आहेत.
या सेवेसाठी 4,000 हून अधिक वितरण केंद्र उभारण्यात आले आहेत. प्रवासी या केंद्रांमधून आपले कार्ड घेऊ शकतात.
अर्जदारांकडून अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या केंद्रांवर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री प्रताप सरनाईकांनी यावेळी दिला आहे.
सरकारने वन नेशन, वन कार्ड या संकल्पनेवर आधारित NCMC स्मार्ट कार्ड सुरु करण्याचा निर्णय घेतला. या एकाच कार्डचा वापर करून प्रवासी एसटी, रेल्वे, मेट्रो, बससह टोलचा टॅक्सही भरू शकतात.
डिजिटल पेमंटसाठी हे कार्ड उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी त्यांच्या सरल ओळख क्रमांकाशी हे कार्ड कनेक्ट करू शकतात.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आधार क्रमांकाशी हे कार्ड जोडले जाणार आहे. दिव्यांग नागरिकांना त्यांच्या युनिक डिसएबिलिटी आयडीशी (यूडिआयडी) जोडलेली.
