Advertisement

मुंबईसाठी २ आयुक्त हवे, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त असावेत अशी मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

मुंबईसाठी २ आयुक्त हवे, पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी
SHARES

मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त असावेत अशी मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. 

मुंबई शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुंबईचा विस्तारही वाढत आहे. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचं आहे. तशी मागणी आपण शहर विकास विभागाकडे केली असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. 

अस्लम शेख यांनी म्हटलं की,  वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महापालिकेची असते. परंतु सध्या महापालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरीकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. तसंच मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन महापालिका आयुक्त असणं गरजेचे आहे. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पदं निर्माण करावीत.

दरम्यान, अस्लम शेख यांची मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षड्यंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे, अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा