Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

बोरिवलीत प्रकल्पबाधितांसाठी ३८८ सदनिकांचं बांधकाम


बोरिवलीत प्रकल्पबाधितांसाठी ३८८ सदनिकांचं बांधकाम
SHARES

मुंबई महापालिकेच्या वतीनं हाती घेण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पाच्या आड येणाऱ्या कुटुंबांचं पुनर्वसन आता सरसकट माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतींमध्ये केलं जात आहे. परंतु या प्रकल्पबाधितांच्या वसाहतींमध्ये असलेल्या असुविधांमुळे याठिकाणी जाण्यास सर्वांचाच विरोध असल्यानं महापालिकेनं प्रत्येक विभागांमध्ये प्रकल्पबाधितांसाठी सदनिकांचं बांधकाम करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार आता बोरीवलीमध्ये सुमारे ४०० प्रकल्पबाधितांसाठी सदनिका बांधण्याचं काम हाती घेण्यात येणाक आहे. बीएमसीच्या वतीनं प्रकल्पबाधितांसाठी बांधकाम करण्यात आलेली ही पहिली इमारत ठरणार आहे.


माहूलमध्ये जाण्यास विरोध

मुंबई महापालिकेच्यावतीनं जलवाहिनींलगतच्या झोपड्यांवर कारवाई केली जाते. तसेच रस्ते अाणि नाले रुंदीकरणात आड येणाऱ्या बांधकामांवरही कारवाई केली जाते. त्यामुळे यातील पात्र कुटुंबांचं पुनर्वसन हे मुंबईच्या उत्तर दिशेला तसंच एक किलोमीटर परिक्षेत्रात करणं आवश्यक असतानाही सरसकट सर्वांना माहूल येथील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीत पाठवलं जातं. याठिकाणी जाण्यास सर्वांचाच विरोध होत असतो. हीच बाब लक्षात घेऊन प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन विभागातच केलं जावं आणि यासाठी प्रत्येक विभागात प्रकल्पबाधितांसाठी सदनिका बांधल्या जाव्यात, अशी मागणी सर्व लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे.


लोकप्रतिनिधींच्या सूचना मान्य

लोकप्रतिनिधींच्या सूचना मान्य करत बोरीवलीत प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र इमारतीचं बांधकाम केलं जात आहे. बोरीवलीतील १९वा रस्ता असलेल्या मल्हारराव कुलकर्णी रस्त्यावर असलेल्या भूभाग क्रमांक ३९६ वर प्रकल्पबाधितांसाठी सदनिकांचं बांधकाम केलं जात आहे. याठिकाणी असलेल्या मोकळ्या भागावर सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून इमारतीचं बांधकाम केलं जाणार आहे. त्यात रहिवाशी वापरासाठी एकूण ३८८ सदनिका तसेच तळ अधिक एक मजल्यावर कमर्शियल वापरासाठी २९ गाळे बांधले जाणार आहेत.


बोरीवलीतील भविष्यातील प्रकल्प

बोरीवली पूर्व व पश्चिम इथं रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात येणार असून यातील बाधितपात्र कुटुंबांचं पुनर्वसन महात्मा गांधी पथक्रांती योजनेतंर्गत केलं जाणार आहे. त्यासाठी या प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी सदनिकांची नितांत गरज भासणार असून त्यासाठी या सदनिकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा -

माहुल प्रकल्पबाधितांच्या मरण यातना संपणार : २२ इमारतींची दुरुस्ती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा