Advertisement

माहुल प्रकल्पबाधितांच्या मरण यातना संपणार : २२ इमारतींची दुरुस्ती

प्रकल्पबाधितांच्या मरण यातना आता काहीशा कमी होणार असून अखेर माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी २२ इमारतींमधील पाणीपुरवठा, सांडपाण्यासह अंतर्गत सर्वच भागांची दुरुस्ती केली जाणार आहे.

माहुल प्रकल्पबाधितांच्या मरण यातना संपणार : २२ इमारतींची दुरुस्ती
SHARES

प्रकल्पबाधितांच्या मरण यातना आता काहीशा कमी होणार असून अखेर माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी २२ इमारतींमधील पाणीपुरवठा, सांडपाण्यासह अंतर्गत सर्वच भागांची दुरुस्ती केली जाणार आहे.



तातडीने सुविधा देण्याचा निर्णय

मुंबईतील जलवाहिनीलगतच्या झोपड्यांसह रस्ते व नाल्यांच्या कामांमध्ये आड येणाऱ्या सर्वच झोपड्यांमधील कुटुंबांचे पुनर्वसन माहुल गाव येथील एव्हरस्माईल संकुलातील मेसर्स डी. बी. रिअॅल्टि या विकासकाने बांधलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच्या इमारतींमध्ये केले जात आहे. परंतु, या वसाहतींमध्ये कोणतीही सुविधा नसून जलवाहिनी तसेच मलवाहिन्या आणि घरांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे एकप्रकारे या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना मरण यातना सहन कराव्या लागत असून याबाबत महापालिका सभागृहात गोंधळ झाल्यानंतर खुद्द महापौरांच्या नेतृत्वाखाली सभागृहनेते व विरोधी पक्षनेते यांच्यासह गटनेत्यांनी या वसाहतीची पाहणी केली. त्यानंतर सभागृहात या प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.



दुरूस्तीसाठी १५ कोटींचा खर्च

सभागृहात घेतलेल्या निर्णयानुसार येथील २२ इमारतीतील प्रत्येक सदनिकांमधील दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदारांची निवड केली गेली आहे. या २२ इमारती दहा व बारा अशा दोन भागांमध्ये विभागून स्वतंत्र कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या मुद्दयाला सर्वप्रथम भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी वाचा फोडून त्या ठिकाणी सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यापूर्वीही हा विषय अनेकदा चर्चेला आला होता. परंतु यावर धोरणात्मक निर्णय हा पटेल यांनी घडवून आणलेल्या चर्चेनंतरच सभागृहात घेण्यात आला आहे. तर स्थानिक नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांनी आपल्याला या इमारतीतील लोकांचे हाल पाहवत नाहीत, असे सांगत कुणीही या ठिकाणी आपल्या भागातील प्रकल्पबाधितांना पाठवून नये, असे आवाहन नगरसेवकांना केले होते.


कोणत्या प्रकारची केली जाणार दुरुस्ती?

पाणीपुरवठा, सांडपाणी व पावसाळी पाणी वाहून नेणारे पाईप बसवणे
खोल्यांमधील व संडास बाथरुममधील लाद्या बदलणे
संडास-बाथरुममधील प्लॅस्टरिंग
दरवाजे व अॅल्युमिनियमच्या खिडक्या बसवणे अथवा दुरुस्त करणे
सांडपाणी वाहून नेणारे पाईप चेंबर लाईनची दुरुस्ती
सदनिकांमधील तसेच पॅसेजमधील वायरिंगची कामे व केबल मिटरची विद्युत कामे


'या' इमारतींसाठी नेमले कंत्राटदार

१) इमारती क्रमांक - १, ६, ३७, ३८, ३९, ४१, ४२, ५६, ५७, ६४
कंत्राटदाराचे नाव - भव्य एंटरप्रायझेस
कंत्राट रक्कम - ८.५६ कोटी रुपये

२) इमारती क्रमांक - २, ३, ४, ५, ७, ८, ९, १०, ११, ६०, ६१, ६३
कंत्राटदाराचे नाव - देव इंजिनिअर्स
कंत्राट रक्कम - ६.८३ कोटी रुपये



हेही वाचा

माहुल हा नरकच! इथे माणसेही चोरीला जातील...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा