Advertisement

दादर कॉम्प्लेक्समधील रहिवासी दूषित पाण्याने त्रस्त

बीएमसीने तात्काळ तपासणी करावी आणि कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी रहिवाशांची मागणी आहे.

दादर कॉम्प्लेक्समधील रहिवासी दूषित पाण्याने त्रस्त
SHARES

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दादर प्लाझा येथील जे. के. मार्गावरील इंद्रायणी कॉम्प्लेक्समध्ये गेल्या दीड महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिके (बीएमसी) कडे वारंवार तक्रारही केली होती. पण समस्याचे निराकरण न झाल्याने रहिवाशांमध्ये निराशाचे वातावरण आहे. 

बीएमसी दररोज मुंबईला 4,000 दशलक्ष लिटर पाणी पुरवते. जागतिक आरोग्य संघटना आणि आयएसओने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार हे पाणी शुद्ध केले जाते. एकूणच, मुंबईकरांना निर्जंतुकीकरण, स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा महानगरपालिका करते.

तथापि, दादरमधील काही भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागापासून थोड्या अंतरावर असलेल्या इंद्रायणी कॉम्प्लेक्समध्ये गेल्या दीड महिन्यांपासून दूषित पाणी येत आहे.

इंद्रायणी कॉम्प्लेक्समध्ये चार इमारती आणि सुमारे 123 फ्लॅट आहेत. दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इमारतीला दररोज तीन तास पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी अत्यंत घाणेरडे असल्याने पहिला अर्धा तास पाणीपुरवठा बंद करावा लागतो. परिणामी, इमारतीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

महापालिका कर्मचाऱ्यांनी सोसायटीला भेट देऊन पाहणी केली. मात्र, याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पालिका अजूनही पाणी जोडणीची चौकशी करत आहे. बीएमसीने तातडीने तांत्रिक तपासणी करावी आणि पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधून काढावा अशी रहिवाशांची मागणी आहे.

महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही पाण्याची गुणवत्ता सुधारत नाही आहे. हेच लक्षात घेऊन, आमदार महेश सावंत यांनी प्रत्यक्ष तपासणीही केली. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना पाण्याची समस्या सोडवण्याचे आदेश दिले. मात्र, त्यानंतरही कोणतीही सुधारणा झालेली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला.



हेही वाचा

मुंबईत आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेसाठी 2000 कोटींचा निधी

पितृपक्षाच्या विधीनंतर बाणगंगा तलावात मृत मासे आढळले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा