कंत्राटी कामगारांचा पालिकेवर मोर्चा

 Chembur
कंत्राटी कामगारांचा पालिकेवर मोर्चा

चेंबूर - दोन वर्षांपासून वाढीव पगाराची थकबाकी न मिळाल्याने पालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांनी शुक्रवारी पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयावर धडक मोर्चा काढला. २०१३ पासून २०१५ पर्यंतचा ६ टक्के रजा रोखीकरण आणि वाढीव पगार एम पश्चिम अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना पालिकेकडून मिळालेल्या नाही. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करुन देखील पालिका दखल घेत नसल्याने कामगारांनी मोर्चा काढला असून दोन दिवसात यावर निर्णय न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा कचरा वाहतूक श्रमिक संघाचे उपाध्यक्ष दादराव पटेकर यांनी या वेळी दिला आहे.

Loading Comments