Advertisement

वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक


वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक
SHARES

वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी युनायटेड नेशन पुरस्कार विजेते अफरोझ शाह यांनी पुढाकार घेऊन या चौपाटीच्या स्वच्छतेचं काम हाती घेतल्यानंतर आता महापालिकेच्यावतीनं या चौपाटीच्या साफसफाईसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली जाणार आहे. या चौपाटीच्या स्वच्छतेसाठी प्रतिदिन ७९ हजार रुपये खर्च केले जाणार असून सध्या या चौपाटीच्या साफसफाईसाठी प्रतिदिन १४ हजार रुपयांचा खर्च केला जात अाहे.


साफसफाईचा प्रश्न 

जुहू चौपाटीच्या साफसफाईसाठी कंत्राटदाराची नेमणूक करून प्रतिदिन ९० हजारांचा खर्च केला जात आहे. जुहू चौपाटीनंतर दादर-माहिम चौपाटी स्वच्छतेसाठी नेमलेल्या कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिला आहे. दादर- माहिम चौपाटीच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या कंत्राटदाराने पळ काढल्याने या चौपाटीचा साफसफाईचा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, अफरोझने हाती घेतलेल्या वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.


२२ कोटींचं कंत्राट

जुहू चौपाटीचं काम करणाऱ्या स्पेक्ट्रॉन इंजिनिअर्स या कंपनीला वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेचं काम मिळालं आहे. या कंपनीला २२ कोटी २४ लाखांचं काम दिलं जात आहे. वर्सोवा चौपाटीवरील अस्वच्छतेवर साऱ्या जगाचं लक्ष वेधून अफरोझनं याचं काम हाती घेतलं होतं. या चौपाटीवर दर दिवशी सरासरी २५ मेट्रीक टन आणि पावसाळ्यात ४० ते ८० मेट्रीक टन कचरा निघतो.


प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेसाठी

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, वर्सोवा चौपाटीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. याचा कालावधी २०२१ मध्ये संपणार होता. त्यामुळे हे कंत्राट रद्द करून वर्सोवा आणि विस्तारीत चौपाटीच्या स्वच्छतेसाठी पुढील सहा वर्षांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. समितीच्या मान्यनेनंतर या चौपाटीच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.



हेही वाचा -

विद्यापिठाचा असंवदेनशील कारभार : अपंग विद्यार्थ्याचे प्रॅक्टिकल पेपर घेण्यास नकार

रखडलेल्या अमल महल ते ट्रॉम्बे जलबोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा