शाळेच्या छप्पराचं गौडबंगाल काय?

 Mumbai
शाळेच्या छप्पराचं गौडबंगाल काय?
शाळेच्या छप्पराचं गौडबंगाल काय?
शाळेच्या छप्पराचं गौडबंगाल काय?
शाळेच्या छप्पराचं गौडबंगाल काय?
See all

धारावी - पालिकेच्या जी उत्तर विभागानं धारावीतील दोन शाळांवर सिमेंटच्या पत्र्याऐवजी चक्क पुठ्ठ्यांच्या पत्र्यांचे छप्पर टाकल्याचा आरोप शिवसेना शाखाप्रमुख किरण काळे यांनी केलाय. याबाबत उपशाखाप्रमुख नंदू शिंदे, सुरेश कदम, आंबू अर्सन यांनी पालिका अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊन जाब विचारला असता अधिकाऱ्याची बोलती बंद झाली. दरम्यान याबाबत पालिका एस. आय. सी. विभागाच्या सब इंजिनीअर सुषमा गुप्ता यांच्याशी चर्चा केली असता तो सिमेंटचा पत्रा नसून, ती पॉलीप्रोपिलीन नॉन ऍसबेसटॉसची शीट आहे. संशयास्पद पत्र्याबाबत माहिती मिळताच मी छप्पर टाकण्याचे काम थांबविले असून, ती पॉलीप्रोपिलीन नॉन ऍसबेसटॉस शीट टेस्टींगसाठी प्रयोग शाळेत पाठविली आहे. तसे काही आक्षेपार्ह आढळ्यास सर्व पत्रे बदलण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं.

धारावीतल्या एम जी रोडवरील पालिका उर्दू माध्यमाच्या 26 खोल्यांच्या शाळेवर निकृष्ट दर्जाचे पुठ्ठ्यांच्या पत्र्यांचे छप्पर टाकण्यात येत असल्याची माहिती शाळेतील पालक अन्वर शेख आणि वहिदा असिफ मुल्ला यांनी शिवसेना शाखाप्रमुख किरण काळे याना दिली होती. त्यानुसार शिवसेना शाखाप्रमुखाने शिवसैनिकांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पत्र्याची पाहणी केली असता माहिती उजेडात आली.​

Loading Comments