Advertisement

बेस्टचा गाडा हाकायचा कसा? सुट्या वस्तुंच्या पुरवठादारांचेही पैसे थकले


बेस्टचा गाडा हाकायचा कसा? सुट्या वस्तुंच्या पुरवठादारांचेही पैसे थकले
SHARES

आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेने अद्यापही मदतीचा हात दिलेला नाही. त्यामुळे उपक्रमाला कारभाराचा गाडा हाकलणे जिकरीचे बनले असून आर्थिक डबघाईकडे चाललेल्या या उपक्रमाकडे कंत्राटदारांनीही पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. बेस्टच्या परिवहन आणि विद्युत विभागासाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टच्या खरेदीचे पैसेच ८ ते १० महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे कंत्राटदारांनी स्पेअर पार्टसच्या पुरवठ्यासाठी मागवलेल्या निविदांमध्येही भाग घेतलेला नसल्याची बाब समोर आली आहे.


प्रस्ताव मंजूर करा तरच...

महापालिकेने बेस्टला आर्थिक काटकसर करण्याच्या काही शिफारसी केल्या असून तो प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय मदत करण्याचा विचारही करण्यात येणार नाही, असा पवित्रा महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे.

बेस्टला यापूर्वी दिलेल्या १६०० कोटींचा परतावा आयसीआयसीआय बँकेतून इस्क्रो खात्यातून केला जात आहे. ही रक्कम महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न देता शेवट्च्या आठड्यात देण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र, तरीही बेस्टची आर्थिक स्थिती कमजोर असून त्यांना आता कर्मचाऱ्यांचा पगारही वेळेत देणे शक्य नसल्याचे म्हटले जात आहे.


पैसे रखडले

बेस्ट उपक्रमासाठी काही सुट्या भागांचा पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदारांनाही मागील ८ ते १० महिन्यांपासून पैसेच दिलेले नसून हे कंत्राटदार आता पुरवठा करण्याच्या मानसिकतेत नाही. एवढेच नव्हे, तर या सुट्या भागांच्या पुरवठ्यासाठी मागविण्यात येणाऱ्या निविदांसाठी कोणताही कंत्राटदार पुढे येत नसल्याची चिंता विरोधी पक्षनेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.


बस खरेदीचे पैसेही थकले

बेस्ट उपक्रमाच्यावतीने टाटा कंपनीकडून १८५ बेस्ट बसची खरेदी करण्यात आली आहे. या सर्व बस मे महिन्यात बेस्टच्या ताफ्यात आल्या आहेत. या बस खरेदीसाठी येणारा खर्च महापालिका करणार आहे. एकूण ९० कोटी रुपयांच्या कंत्राटापैकी ६० कोटी रुपये कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहेत. महापालिकेनेच बेस्टला ३० कोटी रुपये न दिल्यामुळे टाटा कंपनीला पैसे देण्यात आले नसल्याची टिका रवी राजा यांनी केली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रम भविष्यात आर्थिक डबघाईला गेल्यास त्याला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष जबाबदार राहिल, असा इशारा राजा यांनी केला.



हेही वाचा -

बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीत बोनस नाही?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा