Advertisement

कोरोनावर उपचारासाठी पालिकेकडून 'ह्या' नवीन औषधाचा वापर

कोरोनाची लागण झालेल्या गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने नवीन औषधाचा वापर सुरू केला आहे.

कोरोनावर उपचारासाठी पालिकेकडून 'ह्या' नवीन औषधाचा वापर
SHARES

कोरोनाची लागण झालेल्या गंभीर रूग्णांवर उपचार करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने नवीन औषधाचा वापर सुरू केला आहे.  बीएमसी मेडिकल कॉलेजची रुग्णालये, सायन, नायर, केईएम आणि सेव्हन हिल्स आदी रुग्णालयांनी टॉसिलीझुमाब (Tocilizumab) हे इंजेक्शन वापरण्यास सुरूवात केली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली. याबाबत पालिकेच्या माहितीनुसार, या औषधाचा वापर आतापर्यंत गंभीर परिस्थिती असलेल्या 40 कोरोना रुग्णांवर करण्यात आला आहे. यामधील 30 रुग्णांवर या औषधाचा खूपच चांगला परिणाम दिसून आला.  या औषधाने रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. तसंच रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरजही भासली नसून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे.  

टॉसिलीझुमाब (Tocilizumab) औषधाचा वापर जगभरातील अनेक चिकित्सक आणि रुग्णालयांच्या अनुभवांच्या आधारे केला गेला आहे. धारावीच्या तीन रुग्णांपैकी ज्या 38 वर्षाच्या रुग्णाला हे औषध देण्यात आले त्याला नायर रुग्णालयातून मंगळवारी घरी सोडण्यात आलं.  



हेही वाचा -

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील

धारावी, माहीम आणि दादरमध्ये ६३ नवे करोनाग्रस्त




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा