Advertisement

Coronavirus pandemic: मुंबईत ९४१ नवे रुग्ण, दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू

मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे ९१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३१ हजार ०४० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

Coronavirus pandemic:  मुंबईत  ९४१ नवे रुग्ण, दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाने ८१ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ९४१ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी  दिवसभरात ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा -कोरोनाच्या लढाईत पोलीसांना 'आपत्ती सेवा पदका'ने गौरवणार - गृहमंत्री अनिल देशमुख

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५५ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जून रोजी ६० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १४ जून रोजी एकूण ७९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ९४१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६० हजार १४२ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात  कोरोनाचे ९१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३१ हजार ०४० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा -मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक

राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार २६८  नमुन्यांपैकी  १ लाख १३ हजार  ४४५  नमुने पॉझिटिव्ह (१६.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख  ८६ हजार  ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ८१ मृत्यू झाले आहेत. याशिवाय आज मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. राज्याचा मृत्यूदर ४.८ झाला आहे. आज नोंद झालेल्या ८१ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा (५५), कल्याण-डोंबिवली मनपा (२), भिवंडी-निजामपूर मनपा (२), मीरा-भाईंदर मनपा (११), अहमदनगर (२), पुणे (१), पुणे मनपा (७), पिंपरी चिंचवड मनपा (१).

० १४ जून पर्यंत राज्यात २ लाख ६१ हजार २१० कोविड चाचण्या झालेल्या आहेत

० सक्रीय कंटेनमेंट झोन झोपडपट्टी आणि चाळी – ८२८

० सक्रीय सील बंद इमारती – ४८५९

० २४ तासांमधील संपर्काचा शोध अति जोखिम -  ७५६९

०सद्या CCC1 मधील अति जोखिम संपर्क – २०३८४

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा