Advertisement

मंत्रालयात प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

मंत्रालयातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 वर गेला आहे. गुरूवारी प्रधान सचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळून आलं आहे.

मंत्रालयात प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
SHARES

मंत्रालयातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 6 वर गेला आहे. गुरूवारी प्रधान सचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं आढळून आलं आहे. परराज्यांतील श्रमिक आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या सचिवांच्या विशेष गटात या अधिकाऱ्याचा समावेश होता. या अधिकाऱ्याचा कोरोना

चाचणीचा अहवाल  पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर सचिवांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मंत्रालयात याआधी 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता अधिकाऱ्य़ाला कोरोनाची लागण झाल्याने मंत्रालयातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ इतका झाला आहे.

याआधी मंत्रालयाच्या विविध विभागांत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मंत्रालयात कोरोनाचा प्रवेश झाला होता. मंत्रालयात सफाई कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या चौघांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर निर्जुंतकीकरणासाठी मंत्रालय दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते. 



हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा





Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा