Advertisement

कोरोनामुळं मरोळच्या सुक्या मासळी बाजारात खवय्यांची पाठ

सध्या फार कमी प्रमाणात कोळी महिला बाजारात येत असून खवय्यांची गर्दी होत नाही.

कोरोनामुळं मरोळच्या सुक्या मासळी बाजारात खवय्यांची पाठ
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच (mumbai) लॉकडाऊन (lockdown) करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं अनेकांच्या रोजगारावर पाणी फिरलं असून, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच अंधेरी (पूर्व) मरोळ येथील महाराष्ट्रातील एकमेव सुका मासळी बाजारात (fish market) शुकशुकाट असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या महिला ग्राहकांची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

सध्या फार कमी प्रमाणात कोळी महिला बाजारात येत असून खवय्यांची गर्दी होत नाही. एकीकडे वाढती महागाई आणि कोरोना महामारीचे सावट अशा परिस्थितीत सुक्या मासळी बाजारातील महिलांची बिकट अवस्था निर्माण होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

मुंबईच्या वर्सोवा, धोंडीपाडा, मढ, पातवाडी, भाटी गाव, मालवणी, मनोरी, गोराई, उत्तन, उत्तन डोंगरी चौक, वसई, अर्नाळा, टेंबीपाडा, आगाशी, सातपाटी अशा विविध कोळीवाड्यांमधून कोळी महिला सुकी मासळीची विक्री करून आपल्या परिवाराचे पोट भरतात. परंतू, कोरोनामुळं यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे. 



हेही वाचा -

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा