Advertisement

दुर्दैवी! मुंबईत कोरोनामुळे पहिल्या डबेवाल्याचा मृत्यू

आतापर्यंत डबेवाले कोरोनाच्या संसर्गापासून दूर होते. मात्र, या मृत्यूमुळे डबेवाल्यांवरही कोरोनाचं संकट आलं आहे.

दुर्दैवी! मुंबईत कोरोनामुळे पहिल्या डबेवाल्याचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनामुळे डबेवाल्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे.  संतोष रामचंद्र जाधव (३९) असं मृत डबेवाल्याचं नाव आहे. जाधव यांना कोरोनाची लागण झाली होती.

मालाड येथे ते वास्तव्यास होते. बुधवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास नायर रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली आहे. संतोष जाधव यांच्या मागे आई -वडील, पत्नी व एक मुलगा आहे.

आतापर्यंत डबेवाले कोरोनाच्या संसर्गापासून दूर होते. मात्र, संतोष जाधव यांचे मृत्यूमुळे डबेवाल्यांवरही कोरोनाचं संकट आलं आहे. संतोष जाधव यांचे मृत्युने डबेवाल्यांना धक्का बसला आहे. आम्ही सर्व डबेवाले संतोष जाधव यांच्या कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत, असं सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे.




हेही वाचा -

अंधेरी बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव

Cops Track Down 44 ‘Missing’ Covid Patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा