Advertisement

लाॅकडाऊन ५.० ची घोषणा, कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन

लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली असून देशभरातील कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

लाॅकडाऊन ५.० ची घोषणा, कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन
SHARES

लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची केंद्र सरकारकडून घोषणा (Lockdown extended in containment zones across India until June 30) करण्यात आली असून देशभरातील कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलं आहे. काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपण्याच्या आधीच ही घोषणा करण्यात आली आहे. परंतु हे लाॅकडाऊन काही मोजक्या शहरांपुरतं मर्यादित असेल, तर बहुतांश ठिकाणी लाॅकडाऊन शिथिल करण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.  त्यानुसार लाॅकडाऊन केवळ कंटेन्मेंट झोनपुरतंच मर्यादीत राहणार असून टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.

शनिवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार पाचव्या टप्प्यातील ३ फेजमध्ये शिथिल होणार आहे. या लाॅकडाऊनच्या काळात रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी राहील.  त्याअंतर्गत तर  ८ जूनपासून हॉटेल आणि रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  पण याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणं गरजेचं राहणार आहे. या लाॅकडाऊनमध्ये मंदिर, मशिदी सुरू होणार असून टप्प्याटप्प्याने धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जुलैमध्येच होईल. आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि सामान्य लोकांसाठी सिनेमा हॉलसारखी जागा सुरू करायची की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

  •  रात्री ९ ते पहाटे ५ या काळात देशभरात नाईट कर्फ्यू ठेवण्यात येईल
  • आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल्वे अद्याप सुरू होणार नाही
  • सिनेमा हॉल, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार, प्रेक्षागृह बंदच राहणार आहे

पहिला फेज- (८ जूननंतर या सेवा सुरू होतील) 

  • धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे
  • हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स आणि आतिथ्य संबंधित सेवा
  • आरोग्य मंत्रालय एक नियमावली जारी केली असून जेणेकरून या ठिकाणी सामाजिक अंतर कायम राहील आणि कोरोना इथं पसरणार नाही.

दुसरा फेज -

  • राज्य सरकारांचा सल्ला घेतल्यानंतरच शाळा, महाविद्यालये, शिक्षण, प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था उघडल्या जातील. राज्य सरकार मुलांच्या पालकांशी आणि संस्थांशी संबंधित लोकांशी बोलणी करून निर्णय घेऊ शकतात.
  • अभिप्राय मिळाल्यानंतर या संस्था उघडण्याबाबत जुलैमध्ये निर्णय घेता येईल. आरोग्य मंत्रालय यासाठी नियमावली जारी करेल.

तिसरा फेज - (परिस्थितीनुसार या सेवेसंबंधी निर्णय घेण्यात येईल)

  • आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण,  मेट्रो रेल्वे
  • सिनेमा हॉल, जिम, स्विमिंग पूल, एन्टरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, सभागृह, असेंब्ली हॉल आणि यासारखे इतर ठिकाण
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्ये, धार्मिक समारंभ आणि इतर मोठे मेळावे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा