Advertisement

एसटीतील ३०३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


एसटीतील ३०३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून एसटी महामंडळ एसटीच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देत आहे. परंतु, कोरोनाची एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनाच लागण झाली. आतापर्यंत करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ३०३ वर पोहोटली आहे. करोनाबाधितांपैकी १६० कर्मचारी बरे झाले आहेत. १३६ कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एसटी महामंडळातील आतापर्यंत कोरोनाबाधित ७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित कर्मचाऱ्यांमध्ये मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर, उरण, पनवेल आगारातील १०२ कर्मचारी आहेत. यांपैकी २९ कर्मचारी बरे झाले आहेत. ७३ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. ठाणे विभागातील खोपट, वंदनासह अन्य तीन आगारातील १२४ कर्मचारी करोनाग्रस्त आहेत.

यातील ८८ कर्मचारी बरे झाले आहेत. ७ मृत कर्मचाऱ्यांमध्ये २ ठाणे विभागातील तर १ मुंबई विभागातील आहे. उर्वरित कोरोनाबाधित कर्मचारी व मृत कर्मचारी राज्यातील विविध आगारातील आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढत असल्यानं अखेर एसटी महामंडळाने कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांवर योग्य वेळी उपचार व्हावे यासाठी मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहात करोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.



हेही वाचा -

अखेर डहाणू ते चर्चगेट लोकल रुळावर, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेनं अखेर नाल्यावरील 'तो' फलक हटवला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा