Advertisement

एसटीनं २ हजार २०९ बसमधून ३७ हजार ३२७ मजुरांचा प्रवास

एसटी महामंडळानं विविध आगारातील तब्बल २ हजार २०९ बसद्वारे सुमारे ३७ हजार ३२७ मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे.

एसटीनं २ हजार २०९ बसमधून ३७ हजार ३२७ मजुरांचा प्रवास
SHARES

एसटी महामंडळाकडून इतर राज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यात अडकलेले जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात सोडण्यासाठी एसटीची बस सेवा उपलब्ध आहे. मागील ४ दिवसापासून सुरु असलेल्या या सेवेतून एसटी महामंडळानं विविध आगारातील तब्बल २ हजार २०९ बसद्वारे सुमारे ३७ हजार ३२७ मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत  पोहोचविले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ११ मे रोजी ५३० एसटी बसद्वारे ११ हजार ८६६  मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले.  ९ मे ते ११ मे  कालावधीत २१ हजार ७१४ मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आलं. तसंच, १२ मे रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ५६३ बसमधून १२ हजार ४५९ मजुरांनी राज्याच्या सीमेपर्यंत प्रवास केला.

या हजारो मजुरांना एसटी बसेस मध्ये बसवुन, फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात, एसटी कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे हे सर्व कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं. याबरोबर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.



हेही वाचा -

पावसाळ्यात लोकलचं वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी विविध कामांना गती

२ हजार रिक्षा व टॅक्सी चालकांनी धरली गावची वाट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा