Advertisement

वानखेडे स्टेडियम तब्यात घेणार नाही, मुंबई महापालिका आयुक्तांचा खुलासा

केवळ वानखेडे स्टेडियमच नाही, तर मुंबईतील इतर कुठलंही खेळाचं मैदान ताब्यात घेण्यात येणार नाही, असंही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

वानखेडे स्टेडियम तब्यात घेणार नाही, मुंबई महापालिका आयुक्तांचा खुलासा
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिका (bmc) क्वारंटाईन सेंटर (quarantine center) बनवण्यासाठी चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियम (wankhede stadium) ताब्यात घेणार असल्याच्या बातम्या मागील २ दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये फिरत आहेत. तर या वृत्तात कुठलंही तथ्य नसल्याचा खुलासा मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केला आहे. केवळ वानखेडे स्टेडियमच नाही, तर मुंबईतील इतर कुठलंही खेळाचं मैदान ताब्यात घेण्यात येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

खुल्या मैदानात अशक्य

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना चहल (bmc commissioner iqbal singh chahal) यांनी सांगितलं की, महापालिका वानखेडे स्टेडियम ताब्यात घेणार असल्याच्या बातम्या पाहून मला आश्चर्य वाटलं. काही दिवसांनी मुंबईत पावसाला सुरूवात होईल. अशा स्थितीत खुल्या मैदानात क्वारंटाईन सेंटर बनवलं आणि तिथं पाऊस पाण्यामुळे चिखल झाला तर अडचणी आणखी वाढतील. शिवाय इतक्या मोठ्या मैदानात मंडप उभारता येणार नाही. आपल्याकडे मोठे पार्किंग लाॅट आहेत तिथं आपण क्वारंटाईन सेंटर उभारू शकतो.  

हेही वाचा - क्वारंटाइन सेंटरसाठी वानखेडे स्टेडियमची पालिकेकडून मागणी

दुपटीचा वेग घटला

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा वेग १४.५ टक्क्यांवर आला आहे. ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सरकारने लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने शहरातील  सर्व नागरिकांनी आतापर्यंत जेवढं सहकार्य केलं आहे, ते यापुढंही कायम ठेवलं पाहिजे. जेणेकरून आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाऊ नये असं आवाहन देखील चहल यांनी यावेळी केलं.

विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडियमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती. तर वानखेडे परिसरातील रहिवाशांनी स्टेडियममध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यास विरोध देखील केला होता. 

राऊतांची मागणी

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वानखेडे स्टेडियमसोबत ब्रेबॉर्न स्टेडियमदेखील ताब्यात घेण्याची मागणी ट्विटरवरुन केली होती. त्यावर आपण स्टेडिअम किंवा खेळाची मैदाने ताब्यात घेऊ शकत नाही. मातीची मैदानं असल्याने तिथे पावसाळ्यात चिखल होऊ शकतो. क्वारंन्टाइनसाठी टणक पृष्ठभूमीची गरज असून त्यावर व्यवस्था करता येईल आणि तशी करत आहोत, असं म्हणत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावली हाेती. 

हेही वाचा - गोरेगावच्या नेस्को क्वारंटाईन सेंटरला मुख्यमंत्र्यांची भेट

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा