Advertisement

मुंबईत सील इमारती ७ हजार ९९ तर कंटेन्मेंट झोन ५६८

सद्यस्थितीचा विचार करता मुंबईत ७ हजार ९९ इमारती सील असून, कंटेन्मेंट झोनची संख्या ५६८ एवढी आहे.

मुंबईत सील इमारती ७ हजार ९९ तर कंटेन्मेंट झोन ५६८
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळुहळू वाढत आहे. असं असलं तरी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार शर्तीचे प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप मुंबई महापालिकेला पूर्णत: यात यश आलेले नाही. सद्यस्थितीचा विचार करता मुंबईत ७ हजार ९९ इमारती सील असून, कंटेन्मेंट झोनची संख्या ५६८ एवढी आहे. यातील एकूण घरांची संख्या २ लाख ११ हजार ६६० आहे. एकूण लोकसंख्या ७ लाख ८६ हजार ४७८ आहे.

कोरोना पॉझिटीव्ह प्रकरणांचा आकडा २८ हजार १६९ आहे. सर्वाधिक सील इमारती आर/सी वॉर्डमध्ये असून, हा आकडा १ हजार ३४८ आहे. तर सर्वाधिक कमी सील इमारती ई वॉर्डमध्ये असून, हा आकडा ३७ आहे. कंटेन्मेंट झोनचा विचार केला असता मुंबईत एकूण ५६८ कंटेन्मेंट झोन असून, यातील एकूण घरांची संख्या ८ लाख ४२ हजार ५६३ आहे. तर येथील एकूण लोकसंख्या ३६ लाख ९७ हजार ९६ आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचा आकडा ३१ हजार ९६२ आहे.

सर्वाधिक कंटेन्मेंट झोन एल वॉर्डमध्ये आहेत. हा आकडा ५५ आहे. तर सर्वात कमी कंटेन्मेंट झोन बी वॉर्डमध्ये असून, ही संख्या १ आहे. मुंबईतले ११ वॉर्ड बी, सी, ए, आरएन, एमडब्ल्यू, एचडब्ल्यू, एचई, एमई, पीएस, एफएन, ई यामध्ये कोविड पॉझिटिव्हचे प्रमाण खूप कमी म्हणजे ७ ते ८ टक्के इतके आढळले तर उर्वरित १३ वॉर्डात अधिक पॉझिटिव्हिटी आढळत आहे. मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्युदर कमी होतोय. जूनमध्ये तो ५.५८ टक्के, जुलै ४.८८ टक्के, ऑगस्ट ४.०७ टक्के, सप्टेंबर २.६ टक्के आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातील कोरोना रुग्ण आढळल्यास संपुर्ण इमारत सील करण्यात येत होती. इमारीतीमधील इतर रहिवाशी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेनं हा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही महिन्यांनंतर या निर्णयामध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार इमारतीमधील ज्या मजल्यावर कोरोना रुग्ण आढळला असेल, तोच मजला सील करण्यात येत होता. मात्र, हळुहळू मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणि प्रादुर्भाव कमी होत गेल्यानं महापलिकेनं या निर्णयात आणखी बदल केले. परंतु, सध्यस्थितीत मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेनं १०हून अधिक रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याचा निर्णय घेतला आहे. 



हेही वाचा -

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा