Advertisement

कोरोना मृतांचा आकडा 'या' आजारांमुळेही वाढतोय


कोरोना मृतांचा आकडा 'या' आजारांमुळेही वाढतोय
SHARES

मुंबईत कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मार्चमधील रुग्णांचं प्रमाण, त्यांच्या व्याधींचं स्वरूप आणि जूनमधील रुगणसंख्या व व्याधींच्या स्वरूपामध्ये वाढ झाल्याचं दिसून येते आहे. संसर्ग वाढणारा असला तरीही अन्य व्याधी असलेल्यांनी अधिक काळजी घेत, कोणत्याही तक्रारींबाबत त्वरित उपचार घेणं गरजेचं आहे. विविध प्रकारच्या व्याधी असलेल्या २,८९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यासारख्या व्याधींबरोबरच हृदयविकाराचा तीव्र झटका हेदेखील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे.

हृदयविकाराच्या त्रासामुळं होणाऱ्या कोरोना रुग्णांचे मृत्यू होत असल्याचं आढळून येत आहे. तसंच, यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागातील तज्ज्ञांसोबत चर्चा झाली असून तातडीनं वैद्यकीय मदत उपलब्ध होण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कोरोनाची लक्षणं ही प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी आढळून येतात. त्यामुळं या विषाणूचं वर्तन साथीचा संसर्ग वाढल्यानंतर बदलले आहे का, यादृष्टीनेही अभ्यास सुरू असल्याचं समजतं.

हृदयविकार, कॅन्सर, फुफ्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनासह इतर आजारांची लक्षणं दिसून येतात. या व्यक्ती रूग्णालयात दाखल होईपर्यंत उशीर झालेला असतो. पहिले २ तास उपचाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतात. तसं न झाल्यास जीवाला धोका निर्माण होतो. तरुणांमध्ये एकापेक्षा अधिक आजार असले तरीही कोरोनावर मात करण्याची शक्यता अधिक असते.



हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा