Advertisement

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनालाही कोरोनाचा फटका

मुंबई बंदरात येण्याचं निश्चित झालेल्या तब्बल ८४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनालाही कोरोनाचा फटका
SHARES

कोरोनामुळं राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी या कोरोनाचा फटका आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनाला बसला आहे. मुंबई बंदरात येण्याच्या तयारीत असलेल्या विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांना प्रवासाचा बेत स्थगित करावा लागला. मुंबई बंदरात येण्याचं निश्चित झालेल्या तब्बल ८४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबई बंदरात क्रुझ येण्यावर प्रतिबंध लादण्यात आलं आहे. मार्चपासून ३१ मेपर्यंत मुंबई बंदरात आंतरराष्ट्रीय जहाजांच्या २५ फेऱ्या, तर देशांतर्गत जहाजांच्या ५९ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. विदेशी जहाजांतून मुंबई शहरात येणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण शून्यावर आल्यानं मुंबईतील पर्यटन व्यवसायालाही कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

३१ मेपर्यंत क्रुझचं आगमन सुरू असतं. मात्र, यंदा नेमक्या त्याच कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं लॉकडाऊन तसंच, विविध बंधनांमुळं क्रुझचं आगमन लांबलं. एका क्रुझच्या माध्यमातून बंदरात, शहरात सरासरी १२०० प्रवाशांचं आगमन होतं. यंदा हे क्रुझच आलं नसल्यानं प्रवाशांचं प्रमाण शून्यावर गेले. क्रुझचं आगमन बंद आणि पर्यटन ठप्प झाल्यानं आर्थिक नुकसान सोसावं लागणाऱ्या मुंबई बंदराला नाविकांच्या सीऑफच्या माध्यमातून काही उत्पन्न मिळू शकले. जगाच्या विविध क्रुझवर असलेल्या नाविकांना काम संपल्यावर घरी सोडण्यासाठी विविध देशांतील क्रुझचं मुंबई बंदरात आगमन झाले. त्या माध्यमातून बंदराला काही उत्पन्न मिळालं.



हेही वाचा - 

Shiv Sena Bhavan: शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी सेना भवन सील

जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात- महापालिका आयुक्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा