Advertisement

राणीच्या बागेतील वाघ आणि बिबट्यांनाही लॉकडाऊनचा फटका


राणीच्या बागेतील वाघ आणि बिबट्यांनाही लॉकडाऊनचा फटका
SHARES

कोरोना व्हायरसचा मुंबईसह राज्यभरातील सर्वच सविधांना फटका बसला आहेय अशातच आता पिजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांनाही बसत आहे. या श्‍वापदांना गेल्या काही महिन्यांपासून फ्रिज मधील मासांहारावर भुक भागवावी लागत आहे. कोरोनामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं ताजे मास मिळत नसल्यानं प्राण्यांना फ्रोजन मासांहार दिला जात आहे. मुंबईतील राणीच्या बागेतील वाघ, बिबट्या, तरस आणि लांडग्याला मासांहार द्यावा लागतो.यात प्रामुख्याने बिफ(म्हैशीचे मांस) दिले जाते. तर कधी कधी कोंबड्यांचे मासंही दिले जाते.

दिवसाला ३५ ते ४० किलो मास लागते. यात वाघाला मास बोनलेस असेल तर ५ ते ६ आणि हाडांसह असेल तर १० ते १२ किलो लागतो. त्याशिवाय, या प्राण्यासाठी एक महिन्यांचे मास साठवता येईल अशी क्षमताही प्राणीसंग्रहालयात असल्याची माहिती मिळते. प्राण्यांना खायला देण्यापुर्वी शितगृहातून मास काढून काही काळ ते गरम पाण्यात ठेवले जाते. त्यानंतरच प्राण्यांना मास खायला दिले जाते.

या वर्षाच्या सुरवातीला औरंगाबाद येथून राणीबागेत वाघाची जोडी आणण्यात आली होती. ही जोडी आता मुंबईच्या वातावरणात रुळली आहे. या प्राण्यांना फ्रोजन मांस देण्यास कोणतीही अडचण नाही. तसेच ते प्राण्यांना देण्यापुर्वी योग्य काळजी घेतले जाते. तर,इतर शाकाहारी प्राण्याचे खाद्याही पुरेशा प्रमाणात आहे.

राणीच्या बागेतील पेंग्विनच्या आहारात माशांचा प्रामुख्याने समावेश असतो. मात्र,पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने त्यांना ताजे मासे मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सध्या त्यांनाही फ्रोजन मासळी दिली जात आहे. दरवर्षीच पावसाळ्यात त्यांना फ्रोजन मासळी दिली जाते.



हेही वाचा -

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणी

ठाणे जिल्ह्यासाठी ५ नवीन कोरोना चाचणी केंद्र



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा