Advertisement

रुग्णवाहिकेसाठी चालक नसल्यानं कचरा गाड्यांच्या चालकांची मदत


रुग्णवाहिकेसाठी चालक नसल्यानं कचरा गाड्यांच्या चालकांची मदत
SHARES

मुंबईतील विविध भागांत कोरोना रुग्ण आढळत असून या ठिकाणी रुग्णवाहिका जात आहेत. परंतु, त्याही अपुऱ्या पडत असल्यामुळं मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्या लक्षात घेता महापालिकेनं रुग्णवाहिकांच्या संख्येत वाढ केली आहे. मात्र, या रुग्णवाहिकांसाठी महापालिकेला ड्रायव्हर मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं यावर उपाय म्हणून महापालिकेनं घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा गाड्यांवरील ड्रायव्हर हे रुग्णवाहिकांसाठी नेमले आहेत.

महापालिका प्रशासनानं बेस्ट बस व खासगी वाहनांचा वापर रुग्णवाहिका म्हणून सुरू केला आहे. अशा विविध प्रकारच्या ४००हून अधिक रुग्णवाहिका सध्या महापालिकेकडं आहेत. मात्र, पुरेसे ड्रायव्हर नसल्यानं पालिकेनं घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरील ड्रायव्हर नेमल्याचं अंधेरी येथील के-पूर्व विभागात आढळून आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घनकचऱ्याचे ट्रक चालवणारे चालक सध्या रुग्णवाहिकेवर नेमण्यात आले असून, पुरेसे ड्रायव्हर नसल्यानं मुख्य गॅरेजमधून ८ पैकी फक्त २ किंवा ३ डम्पर येत असल्याची समजतं. याप्रकरणी कचरा रोज उचलला न गेल्यास मुंबईत पावसाळी रोगांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे काही महिन्यांकरिता रुग्णवाहिका अथवा कचऱ्याची वाहनं चालवण्याकरिता कंत्राटी चालक नेमावेत, अशी मागणी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी पालिकेकडे केल्याचं समजतं.



हेही वाचा -

महापालिकेनं सर्वाधिक ७९० इमारती केल्या सील

अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी फास आवळला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा