केसांची स्टाईल करणं आणि वेगवेगळे हेअरकलर करण्याकडे तरुणांचा कल असतो. नावाजलेल्या सलूनमध्ये केस कापण्यात अनेकांना आवड असते. परंतु, आता या आवडीसाठी मुंबईकरांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण सलूनमध्ये केस कापणं आणि दाढी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
कोरोनापासून ग्राहकांच्या सुरक्षेच्या नावावर मुंबई सलून ब्यूटीपार्लर असोसिएशननं आपल्या प्रत्येक सेवेवर सुमारे ५० टक्क्यांपर्यंत दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केस कापण्यासाठी ग्राहकांकडून याआधी ८० ते १०० रुपये खर्च करावे लागत होते. मात्र, आता या दरांमध्ये वाढ झाल्यानं १६० ते २०० रुपये इतका खर्च येणार आहे. दाढीसाठी ५० रुपयांऐवजी आता १०० रुपये मोजावे लागणार आहेत.
फेस मसाज आणि फेशियलसह अन्य सेवांसाठी ग्राहकांना आधीपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे. तसंच, आता प्रत्येक ग्राहकाची नोंद ठेवली जाणार आहे. त्यांचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक मागण्यात येणार असून, नोंद करण्यात येणार आहे. यानंतर तापमान मोजल्यानंतरच ग्राहकांना प्रवेश दिला जाणार आहे. गर्दीपासून वाचण्यासाठी ग्राहकांच्या अपॉइन्मेंटनुसार त्यांना बोलवण्यात येणार आहे.
ही दरवाढ शनिवारी रात्रीपासून संपूर्ण मुंबईमध्ये लागू होणार आहे. तसंच, दरांची वाढ ही नफा कमवण्यासाठी नसून ही वाढ सुरक्षा देण्यासाठी करण्यात आली असल्याचं असोसिएशनचे अध्यक्ष तुषार चव्हाण यांनी स्पष्ट केलं. क्लिनिकल सलून असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांच्यानुसार कोरोनामुळे सलूनांचे रूप बदलले आहे. ग्राहक आणि सलून वर्कर यांचा थेट संपर्क येत असल्यानं आता सलूनना क्लिनिकल सलूनच्या रूपात बदलावे लागणार आहे.
कोरोनापासून स्वत:चं आणि ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक सलूनच्या मालकाला महिन्याला साधारणत: ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागणार आहे. यामध्ये कामगारांसाठी पीपीई किट, ग्लोज आणि सलून सॅनिटराईझ करण्याचा खर्च करावा लागणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मालकांना सलूनमध्ये दररोज सॅनिटाईझ करावं लागणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सलूनच्या रचनेत बदल
हेही वाचा -
24 तासात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 'इतकी' वाढली, तर 27 जणांचा मृत्यू
लॉकडाऊनच्या काळाचा रेल्वे प्रशासनाची मोलाची कामगिरी