Advertisement

धारावीतील ३७ हजारांहून अधिक जण अलगीकरणात


धारावीतील ३७ हजारांहून अधिक जण अलगीकरणात
SHARES

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत. परंतु, या लगुउद्योगांना कोरोनामुळं टाळं लागलं आहे. धारावीमध्ये कोरोनाचा थैमान सुरू असून, कोरोनाबाधितांची संख्या १०६१ वर पोहोचली आहे. त्याशिवाय, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल ३७ हजारांहून अधिक धारावीकरांना अलगीकरणात ठेवण्याची वेळ महापालिके वर ओढवली आहे.

धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्याचदिवशी संध्याकाळी शीव रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर धारावीमध्ये सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. परिणामी अवघ्या काही दिवसांमध्येच धारावीतील करोनाबाधितांची संख्या १०६१ वर पोहोचली आहे.

धारावीतील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या गटातील सुमारे ६,४९६, तर कमी जोखमीच्या गटातील सुमारे ३०,७५० जणांचा महापालिकेनं शोध घेतला आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळं अति आणि कमी जोखमीच्या गटातील नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं महापालिकेनं या सर्वाना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापैकी ३१,७२५ जणांना घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तसंच, महापालिकेनं व्यवस्था केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ५,८५७ जणांना ठेवण्यात आलं आहे. परंतु, घरीच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आलेल्या ३१,७२५ जणांवर लक्ष ठेवणे यंत्रणेला अशक्य आहे. 



हेही वाचा -

...अन्यथा बेस्टच्या सेवा सोमवारपासून बंद?

पोलिसांवर हल्लाप्रकरणी 218 गुन्हे, 770 जणांना अटक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा