Advertisement

...अन्यथा बेस्टची सेवा सोमवारपासून बंद?


...अन्यथा बेस्टची सेवा सोमवारपासून बंद?
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईची दुसरी लाइफलाइन बेस्ट अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकसेवा पुरवत आहे. जीव धोक्यात घालून वाहतुक सेवा पुरवत असणाऱ्या या बेस्ट कर्मचाऱ्यांनाच कोरोनानं टार्गेट केलं आहे. बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून, मृत्यच्या संख्येतही वाढ होत आहे.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देताना बेस्ट कर्मचाऱ्यांचाही जीव धोक्यात येत आहे. आतापर्यंत बेस्टच्या परिवहन आणि वीजपुरवठा विभागातील एकूण ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातप्रमाणं, ६०० कर्मचारी विलगीकरणात होते. त्यामुळं कर्मचाऱ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर ते सोमवारपासून घरी रहा, सुरक्षित रहा या सरकारच्या घोषणेचा अवलंब करतील, अशा इशारा बेस्ट संयुक्त कृती समितीनं दिला आहे.

बेस्टमधील ९५ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. बुधवारी आणखी १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली. ९५ पैकी आतापर्यंत पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ५७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे. आतापर्यंत ३३ कर्मचारी बरे झाले आहेत. 



हेही वाचा -

बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळं मृत्यू

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ३० जूनपर्यंत रेल्वेगाड्या रद्द



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा