Advertisement

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ३० जूनपर्यंत रेल्वेगाड्या रद्द


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ३० जूनपर्यंत रेल्वेगाड्या रद्द
SHARES

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं ३० जूनपर्यंत रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं लांबपल्ल्याची रेल्वेसेवा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. या गाड्यांची तिकिटंही रद्द होणार असून, तिकिटांचा संपूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. या काळात विशेष प्रवासी रेल्वे, श्रमिक एक्स्प्रेस आणि मालवाहू गाड्या धावणार आहेत. त्याचप्रमाणं, विशेष प्रवासी एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयानं मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

प्रवासाआधीच्या चाचणीत अपात्र ठरल्यास प्रवाशास गाडीत चढण्याची मुभा नसेल. अशा प्रवाशांना स्थानकातील तिकीट तपासनीसांकडून 'करोना लक्षणे असल्याने प्रवासास अनुमती नाही', असे प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यांना ऑनलाइनद्वारे तिकीट परताव्याची संपूर्ण रक्कम मिळेल. रेल्वे प्रवाशांना आरोग्यसेतू मोबाइल अॅप अनिवार्य आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजी अशा ११ भाषांमध्ये हे अॅप वापरता येते. ज्या प्रवाशांकडे अॅप नसेल, त्यांना ते डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. रेल्वे प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे तपशीलवार पत्ते घेण्यात येत आहेत. भविष्यात यांच्यापैकी कोणाला करोनाची बाधा झाल्यास ही माहिती उपयुक्त ठरेल.

देशभरात १ मे ते १४ मे या काळात ८०० श्रमिक एक्स्प्रेसने १० लाखांहून अधिक कामगारांना मूळ राज्यात सुखरूप पोहोचवले आहे. ज्या राज्यातून श्रमिक पाठवायचे आणि ज्या राज्यात प्रवासी पोहोचणार अशा दोन्ही राज्य सरकारांच्या मंजुरीनंतर श्रमिक एक्स्प्रेस चालवण्यात येत आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

मुंबईहून रत्नागिरीत 'असा' फोफावतोय कोरोना? गावकरी आले टेन्शनमध्ये



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा