Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

Coronavirus Updates: मुंबईतील मृत्यूदर तब्बल ५.२७ टक्क्यांवर


Coronavirus Updates: मुंबईतील मृत्यूदर तब्बल ५.२७ टक्क्यांवर
SHARES

मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. रुग्णवाढी प्रमाणेचं मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या ६१,५०१ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा ३,२४२ वर गेला आहे. मुंबईत मागील २४ तासांत १,३५९ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंतची ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. त्याचप्रमाणं धक्कादायक म्हणजे ३.३ टक्क्यांवर असलेला मृत्यूदर आता ५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा वाढल्यामुळं आणि मंगळवारी तुलनेनं कमी म्हणजेच ९४२ रुग्ण आढळल्यामुळं रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र बुधवारी यामध्ये आणखी १३५९ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २६,९२१ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३१,३३८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मार्चपासून झालेल्या ८६२ मृतांची संख्या नुकतीच मृत्यूच्या आकडेवारीत समाविष्ट केल्यानं मृतांचा आकडा वाढला असून मृत्यूदरही वाढला आहे.

७७ मृतांपैकी ५३ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. ४३ जणांचे वय ६० वर्षांवरील होते, तर ७ जणांचे वय ४० वर्षांखाली होते. धारावीतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून १७ जून रोजी १७ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसाला ९० पर्यंत रुग्ण आढळणाऱ्या धारावीत रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. धारावीतील महापालिका शाळेच्या विलगीकरण केंद्रातील सर्व रुग्ण आता बरे होऊन गेले असल्यामुळे या शाळेतील विलगीकरण केंद्रातील सर्व सामान, खाटा, गाद्या हलवण्यात आल्या आहेत.हेही वाचा -

मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन

एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीरसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा