Advertisement

हिंदुजा रुग्णालयत परिचारिकांचं आंदोलन

माहिम येथील हिंदूजा रुग्णालयातील परिचारिकांनी रविवारी आंदोलन केलं.

हिंदुजा रुग्णालयत परिचारिकांचं आंदोलन
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर माहिम येथील हिंदूजा रुग्णालयातील परिचारिकांनी रविवारी आंदोलन केलं. कोरोनासाठी वैद्यकीय उपचार हे रुग्णालयामध्येच मिळावेत या मागणीसाठी काम बंद आंदोलन केलं. मागील काही दिवसांपासून रुग्णालयामधील वैद्यकीय कर्मचारी तसंच, परिचारिकांकडून संसर्ग होत असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या. विलगीकरण करण्यात आलं नाही तर हा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत होती.

ज्या परिचारिकांना संसर्ग झाला आहे त्यांना पालिका रूग्णालयामध्ये न पाठवता रूग्णालयामध्येच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करावेत, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र रुग्णालय प्रशासनानं त्याकडे लक्ष न दिल्याचा आरोप परिचारिकांनी केला होता. रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर वैद्यकीय उपचार होत असतील तर त्यांना इतर ठिकाणी का पाठवण्यात का येते, असाही आक्षेप त्यांनी घेतला.

हेही वाचा - हिंदुजा रुग्णालयाचा आसपासचा परिसर पूर्णपणे बंद

रविवारी दुपारी रुग्णालयाच्या आवारामध्ये परिचारिकांनी काम बंद आंदोलन केलं. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. समाधानकारक तोडगा निघेपर्यंत ते सुरू ठेवण्याचा पवित्रा परिचारिकांनी घेतला होता. काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, मात्र त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहे.

महापालिकेनं दिलेल्या नियमावलीनुसार ज्यांना लक्षणं आहेत, अशाच रुग्णांना पालिकेनं दिलेल्या विलगीकरण कक्षामध्ये पाठण्यात आलं आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयातील सर्व खाटा भरलेल्या आहे, आयसीयूमधील काही खाटा या पालिकेच्या नियमानुसार पालिका रुग्णालयातून येणाऱ्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. करोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांना नियमानुसार तिथं वैद्यकीय उपचारासाठी दाखल करू शकत नाही, अशी माहिती रुग्णालयानं दिल्याचं समजतं.



हेही वाचा -

'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून

हरवलेली आई २ वर्षांनी मुलाला भेटली, माय-लेकाची हृदयस्पर्शी कहाणी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा