Advertisement

'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून

पावसाच्या आगमन आणि प्रवासावर काही बदल झाल्याचं स्कायमेटला आढळलं आहे.

'या' तारखेला मुंबईत दाखल होणार मान्सून
SHARES

पावसाच्या (Rian) आगमन आणि प्रवासावर काही बदल झाल्याचं स्कायमेटला (Skymet) आढळलं आहे. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. १ जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं (Monsoon) वेळापत्रक बदलतं. पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं १९६१ ते २०१९ दरम्यान ५८ वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यात काही बदल झालेले जाणवले.

यंदा मान्सून १ जूनलाच दाखल होणार आहे. यामध्ये कोणताही बदल नसेल. पण काही राज्यांमध्ये मान्सूनचा प्रवासाची वेळ बदलली आहे. स्कायमेटनं दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून ३ ते ७ दिवस लवकर किंवा उशिरानं येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातही १५ जुलैऐवजी ८ जुलैला मान्सून दाखल होईल.

दिल्लीमध्ये (Delhi weather) मान्सून २३ जून ऐवजी २७ जून रोजी दाखल होईल. तर मुंबईमध्ये (Mumbai Rain) १० जून ऐवजी ११ ला धडकण्याची शक्यता आहे. तर यंदाचा मान्सून २९ सप्टेंबर ऐवजी ८ ऑक्टोबरपर्यंत मुक्काम करेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.



हेही वाचा

यंदाच्या पावसाळ्यात 20 दिवस हाय टाईड, जास्त पावसाने मुंबई तुंबण्याची भीती

महाराष्ट्रात उन्हाची काहिली, देशात 10 उष्ण शहरांमध्ये राज्यातील 5 शहरं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा