Advertisement

एक लाखांहून अधिक एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार प्राथमिकतेने द्या, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेनं केली आहे.

एक लाखांहून अधिक एसटी कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत
SHARES

मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून वाहतुक सेवा पुरविली जात आहे. मात्र, या जीवघेण्या व्हायरससमोर आव्हानात्मक काम करणारे एसटी महामंडळातील एक लाखांहून अधिक कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांचे पगार प्राथमिकतेने द्या, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेनं केली आहे.

मे महिना निम्मा संपत आला तरी अद्याप एप्रिल महिन्यातील पगार मिळालेला नाही. त्यातच मार्च महिन्याचा अर्धाच पगार एप्रिल महिन्यात देण्यात आला. आधीच राज्यात सर्वात कमी वेतन आणि त्यातही वेतनविलंब यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवारावर अर्धपोटी राहून घरखर्च भागवण्याची वेळ आली आहे. पोलिस, परिचारिका, सफाई कामगार, पालिका कामगार यांच्या प्रवासासाठी मुंबईत एसटी कर्मचारी-अधिकारी दिवसरात्र राबत आहेत.

राज्यात ऊसतोड कर्मचारी, कोटा येथून विद्यार्थी वाहतूक एसटीतून करण्यात आली. परप्रांतीय श्रमिकांची वाहतूकही एसटीतूनच होत आहे. यामुळे राज्य सरकारनं एसटी सवलतीची प्रतिपूर्ती म्हणून देय असलेली ५४७ कोटींची रक्कम महामंडळाला देऊन एसटी कामगारांचे पगार द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.



हेही वाचा -

यंदा पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी

पुढचे ५ दिवस मिरा-भाईंदर पूर्णपणे बंद!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा