Advertisement

परप्रांतीय मजुरांसाठी 'बेस्ट'नं घेतली धाव

बेस्ट बसने अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला सेवा दिली. विशेष म्हणजे बेस्ट परप्रांतीयांच्या मदतीला सुद्धा धावली आहे.

परप्रांतीय मजुरांसाठी 'बेस्ट'नं घेतली धाव
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक असून मागील ३ महिन्यांपासून मुंबई बंद आहे. मुंबईला पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार व महापालिका सतत प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळं कठीण परिस्थितीचा सामना प्रशासनाला करावा लागतो. असं असलं तरी लॉकडाऊनच्या काळात अत्यानश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात कामसाठी जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळं या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची दुसरी लाइफलाइन बेस्टनं आपली सेवा सुरू ठेवली. या बेस्ट बसने अडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला सेवा दिली. विशेष म्हणजे बेस्ट परप्रांतीयांच्या मदतीला सुद्धा धावली आहे.

कोरोनामुळं बेस्टच्या फेऱ्यांमध्ये घट झाली आहे. मात्र परिस्थिती गंभीर असली तरी 'प्रवासी हा आमचा देव' असं मानत सर्वांनात घरापर्यंत वाहतूक सेवा दिली. मुंबई शहर आणि उपनगरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर येथील सर्वच वाहतूक व्यवस्था बंद पडली. लोकल बंद पडल्यानं मुंबईचा कणाच मोडला. मात्र बेस्टनं मुंबईला सावरलं. अत्यावश्यक सेवेसाठी धावून गेलेली बेस्ट बस कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठीच्या प्रवासातही कामी आली.

बेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रुझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी येथूनही बेस्ट बस सोडण्यात आल्या. जे प्रवासी मुंबईच्या बाहेरून प्रवास करत मुंबईत दाखल होत आहेत, त्यांच्यासाठी विरार ते मालवणी, नालासोपारा ते गोरेगाव, नालासोपारा ते पोयसर, बदलापूर ते सायन, कल्याण ते सायन, पनवेल ते सायन अशा बेस्ट बसगाड्या धावत आहे.

मजुरांना रेल्वेस्थानकापर्यंत सोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे पोलिसांच्या मागणीनुसार बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिकीट भाडे आकारणी बंद करण्यात आली. मजुरांचा रेल्वेस्थानकापर्यंतचा प्रवास विनाशुल्क करण्यात आला.



हेही वाचा -

यंदा डासांमुळं होणाऱ्या आजारांमध्ये घट

मुंबईत सलून, ब्युटी पार्लर, मंगल कार्यालयांसाठी नवी नियमावली जाहिर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा