Advertisement

मुंबईत सलून, ब्युटी पार्लर, मंगल कार्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर


मुंबईत सलून, ब्युटी पार्लर, मंगल कार्यालयांसाठी नवी नियमावली जाहीर
SHARES
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं मुंबईसह राज्यभरातील सलून बंद ठेवण्यात आले होते. तसंच ब्युटी पार्लर, मंगल कार्यालये ही बंद ठेवली होती. मात्र, अनलॉक 1.0 च्या अंतर्गत राज्य सरकारनं २८ जूनपासून सलून सुरु करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, मागील रविवारपासून मुंबईतील अनेक सलून सुरु झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेनं  सलून, ब्युटी पार्लर व मंगल कार्यालये तसंच, सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, यासाठी सुधारित निर्देश बुधवारी जारी केले आहेत.


सलून, ब्युटी पार्लर

  • केश कर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर या ठिकाणी पूर्वनियोजित वेळ घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. सर्व आस्थापनांमध्ये हवा खेळती राहील, अशी व्यवस्था बंधनकारक असून वातानुकूलीन यंत्रणेने बंदिस्त ठिकाण नसावं
  • केस कापणे, केसांना कलप लावणे, वॅक्सींग, थ्रेडींग या कामालाच परवानगी असेल. तसेच त्वचेशी संबंधित कोणत्याही सेवेस परवानगी देण्यात आलेली नाही. याबद्दलची माहिती प्रवेशद्वारावर ठळकपणे लावणे बंधनकारक.
  • कर्मचाऱ्यांनी हातमोजे, अॅप्रन, मास्क वापरणे बंधनकारक आहे. आवश्यक सेवा दिल्यानंतर खुर्ची निर्जंतुक करावी. तसेच दुकानातील फरशी, जमीन दर दोन तासांनी निर्जंतुक करणे बंधनकारक.
  • प्रत्येक गिऱ्हाइकासाठी स्वतंत्र डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकिन, रुमाल वापरणे आवश्यक आहे. जी उपकरणे डिस्पोजेबल नाहीत, अशा सर्व बाबी प्रत्येक वापरानंतर 'सॅनिटाइज' व 'स्टॅरालाइज' करावयाच्या आहेत.
  • सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व सूचनांची माहिती गिऱ्हाइकांच्या माहितीसाठी ठळकपणे प्रदर्शित करावयाची आहे.

मंगल कार्यालय

गर्दी टाळण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लग्न कार्यांसाठी ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाही, याची काळजी घ्यावी.

सामाजिक वावर काटेकोरपणे पाळून विनावातानुकूलित मंगल कार्यालय हॉल, सभागृह यामध्ये लग्न समारंभ पार पाडण्यास अटींसापेक्ष परवानगी देण्यात येणार.

कार्यालयांसाठी मार्गदर्शक तत्वे

  • शक्यतो घरुन काम करणे अवलंबावे. या अंतर्गत कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करावेत.
  • थर्मल स्क्रीनिंग करुन तापमान मोजण्याची व्यवस्था करणे, साबणाने हात धुण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे तसेच प्रवेशद्वारावर व बाहेर पडण्याच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करणे.
  • कार्यालयाचे, कार्यालयातील सुविधांचे तसेच ज्या ठिकाणी मानवी संपर्क होऊ शकतो, अशा ठिकाणांचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे.
  • कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये सामाजिक वावर आवश्यक. दोन शिफ्टदरम्यान पुरेसे अंतर असावे. जेवणासाठी कर्मचाऱ्यांच्या वेळा वेगवेगळ्या असाव्यात.



हेही वाचा -

Ganesh Chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती

Mumbai Rains: ४ जुलैपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा