Advertisement

बापरे! नोव्हेंबरमध्ये कोरोना असणार उच्च पातळीवर- ICMR

जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये नाहितर नोव्हेंबरमध्ये उच्च पातळीवर असणार असल्याचा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) केला आहे.

बापरे! नोव्हेंबरमध्ये कोरोना असणार उच्च पातळीवर- ICMR
SHARES

राज्यातील कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक जणांना तर्क लावण्यास सुरूवात केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थंट व दमट वातावरणात वाढ असून गरम वातावरण त्याच्या प्रादुर्भाव कमी असतो. या माहितीवरून अनेकांनी पावसाळ्या संसर्गजन्य आजार वाढतात. त्यांच्यासोबत कोरोनाही सर्वत्र पसरणार आणि अनेक जणांना त्याची लागण होणार असला अंदाज बांधत होते. परंतु, या संगळ्यांचा अंदाज खोटा ठरला असून कोरोना हा जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये नाहितर नोव्हेंबरमध्ये उच्च पातळीवर असणार असल्याचा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) केला आहे.

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उच्च पातळीवर पोहोचेल आणि त्यावेळी विलगीकरण तसेच आयसीयू खाटांची आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासेल, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पुढाकाराने करण्यात आलेल्या एका अभ्यासात काढण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधा ८० टक्क्यांपर्यंत वाढविल्यास करोनाचा प्रभाव कमी करणे शक्य होईल, असेही या अभ्यासात म्हटले आहे.

आयसीएमआरनं केलेल्या अभ्यासामध्ये लॉकडाऊनचे फायदे सांगण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा उद्रेक ३४ ते ७६ दिवस पुढे गेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊननं संभाव्य कोरोना रुग्णांची संख्या ६९ ते ९७ टक्क्यांनी कमी केली. या काळात आरोग्य सुविधा सुधारण्यास मदत मिळाली. मात्र, आता लॉकडाऊन उठविण्यात आला आहे.

नोव्हेंबरच्या मध्यावर कोरोना देशात खूप मोठा उद्रेक करणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये म्हणजेच ५.४ महिन्यांसाठी आयसोलेशन बेड, ४.६ महिन्यांसाठी आयसीयू बेड आणि ३.९ महिन्यांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवू लागणार आहे.



हेही वाचा -

दिलासादायक! तब्बल 'इतक्या' कॅन्सरग्रस्तांची कोरोनावर मात

सोमवारपासून ऑनलाइन शिक्षण सुरू; विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साह



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा