Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

Coronavirua Updates: माहीम, दादरमध्ये ४२ नवे कोरोनाबाधित


Coronavirua Updates: माहीम, दादरमध्ये ४२ नवे कोरोनाबाधित
SHARES

मुंबईतील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. धारावीत सोमवारी ८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान धारावी पाठोपाठ आता दादर आणि माहिम परिसरातील कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे. माहीममध्ये सोमवारी २८, तर दादर परिसरात आज १४ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले.

दादरमधील रुग्णांमध्ये १० महिला आणि ४ पुरुष आहेत. तर माहीममधील आज सापडलेल्या रुग्णांमध्ये १६ पुरुष आणि १२ महिला आहेत. दादरमधील एकूण बाधितांची संख्या १७३ वर पोहोचली आहे. तर माहीममधील रुग्णांची एकूण संख्या २२१ वर पोहोचली आहे.

मुंबईतील कोरोनाचा धोका वाढला असून, राज्य सरकार व महापालिका मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी राज्यात २०३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या ३५ हजारांहून अधिक झाली आहे.हेही वाचा -

महापालिकेकडून बेस्टला १२५ कोटींची आर्थिक मदत

भूमिपुत्रांनो सज्ज व्हा! रोजगाराची संधी सोडू नका : मुख्यमंत्रीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा