कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता अनेक जण आपली योग्य ती काळजी घेत आहेत. घराबाहेर पडताना घरात येताना स्वत:ला सॅनिटायझरनी स्वच्छ करत आहेत. महापालिका देखील कोरोनाला रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. अशातच गृहनिर्माण संस्थांतील कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला सोसायटीतील रहिवाशांचे तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासून त्याच्या नोंदी ठेवण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
महापालिकेच्या या निर्णयामुळं तसंच, दिलेल्या या जबाबदारीमुळे आपणच कोरोनाबाधितांच्या संपर्कात येण्याची भीती या पदाधिकाऱ्याना सतावत आहे. त्यामुळं अनेक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या आदेशांची अंमलबजावणी करण्यास विरोध केला आहे. महापालिकेच्या एल विभाग अधिकाऱ्यांनी कुर्ला व परिसरातील अनेक सोसायट्यांना पत्र पाठवून थर्मामीटर गन व पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या आहेत सुचना
महापालिकेच्या या सुचनांचे पालन करणे अशक्य असून त्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका असल्याची पदाधिकाऱ्याना आहे. अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना जिने चढून घरोघरी जाणे शक्य नाही. बहुसंख्य इमारतींमध्ये लिफ्ट नाहीत. त्याचबरोबर ते कोणाच्याही घरी गेल्यास कोरोनाची लागण त्यांनाही होऊ शकते. त्यामुळे महापालिकेने हे निर्देश मागे घ्यावेत, अशी विनंती केली जात आहे.
हेही वाचा -
Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित
डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय