Advertisement

Sion flyover work: सायन उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा सुरूवात

सामग्री मिळाल्यामुळं सायन उड्डाणपुलाचं रखडलेलं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

Sion flyover work: सायन उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा सुरूवात
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं परराज्यातून येणारी सामग्री मिळत नव्हती. परंतु, आता ही सामग्री मिळाल्यामुळं सायन उड्डाणपुलाचं रखडलेलं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. पुलाचे अद्याप ८० बेअरिंग बदलणं बाकी असून, सध्या सुरू असलेले ३४ गर्डरच्या मजबुतीकरणाचं काम संपल्यावर पुढील महिन्यात बेअरिंग बदलले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सायन उड्डाणपुलाच्या सांध्यांमध्ये पोकळी निर्माण झाल्यानं ते बदलण्याची शिफारस संरचनात्मक अहवालात २०१८ मध्ये करण्यात आली. त्यानुसार एक वर्षांपूर्वीच १६० बेअरिंग बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतला. या कामाला १४ फेब्रुवारीपासून सुरूवात करण्यात आली. मुंबईत लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी एकूण ८० बेअरिंग बदलण्याचं काम पूर्ण झालं असून, अद्याप ८० बेअरिंग बदलणं बाकी आहे.

बेअरिंग बदलण्याबरोबरच गर्डरचे मजबुतीकरणदेखील केलं जात आहे. या कामासाठी काही सामग्री कंत्राटदारानं परराज्यातून मागवली होती. मात्र लॉकडाऊनमध्ये प्रवासावरील निर्बंधामुळं ती मुंबईत येणं कठीण झालं होतं. मात्र, आता ही सामग्री उपलब्ध झाली असून, कामाला पुन्हा वेग आला आहे. १४ फेब्रुवारीपासून प्रत्येक आठवड्यात ४ दिवस पुलावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवून बेअरिंग बदलण्याचं काम सुरू झालं.

८० बेअरिंगसाठी किमान ३ टप्प्यांत पुलावरील वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. मात्र त्यापूर्वी गर्डर मजबुतीकरणाचं काम केलं जाणार आहे. पुढील महिन्यात बेअरिंगचं काम हाती घेतलं जाण्याची शक्यता असून, त्यापूर्वी वाहतूक बंदीचं नियोजन वाहतूक पोलिसांशी चर्चा करून ठरवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. बेअरिंग बदलण्याचं काम पूर्ण झाल्यावर गर्डरचं एक्स्पान्शन जॉइन्ट बदलणं आणि डांबरीकरणासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.



हेही वाचा - 

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा