Advertisement

साहेब, तुम्ही सीएम असता तर..., देवेंद्र फडणवीसांसमोर पोलीस झाले भावूक

एका पोलीसानं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडं भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

साहेब, तुम्ही सीएम असता तर..., देवेंद्र फडणवीसांसमोर पोलीस झाले भावूक
SHARES

मुंबईसह राज्यभरात जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करत पोलीस यंत्रणा आपलं कार्य चोख बजावत आहे. असं असलं तरी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्यातील अनेक पोलिसांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. अशातच एका पोलीसानं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडं भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

'साहेब आमच्याकडे किट नाही, मास्क नाही, सॅनिटायझर नाहीत. कामाचा प्रचंड तणाव आहे. तुम्ही मुख्यमंत्री असता तर आमच्यावर आज ही वेळ आली नसती', अशा भावना जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा येथे हायवेवर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्या.


कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली किट्स, मास्क किंवा सॅनिटायझर यासारख्या वस्तू पोलीस यंत्रणेला अपुऱ्या पडत असल्यानं आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या नाही, याकडे त्यानं लक्ष वेधलं. रविवारी नागपूरहून मुंबईला जात असताना खंडेराव मुंढे यांच्या विनंतीस मान देऊन देवेंद्र फडणवीस हे किन्हीराजा येथील शिवाजी हायस्कूलजवळ थांबले. त्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांची त्यांनी आपुलुकीनं विचारपूस केली.

'प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्या, कोरोनाला दूर ठेवा, पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत, त्यांनीही योग्य तऱ्हेनं आपला बचाव करावा', असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांची गाजी पुढे जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडली. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली किट्स, मास्क किंवा सॅनिटायझर यासारख्या वस्तू आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या नाही, याकडे त्यानं लक्ष वेधलं. तुम्ही मुख्यमंत्री असता, तर ही वेळ आली नसती, असंही हा पोलीस कर्मचारी म्हणाला. त्याचं म्हणणं फडणवीसांनी ऐकून घेतलं.



हेही वाचा -

CBSE १०वी, १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुख्यमंत्र्यांनी घेतली आमदारकीची शपथ, मुख्यमंत्रीपदावरील संकट अखेर दूर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा