Advertisement

धक्कादायक ! बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह शौचालयात सापडला, शिवडी टीबी रुग्णालयातील प्रकार

रुग्णालयाच्या या हलगर्जी पणाची दखल पालिकेकडून घेण्यात आली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

धक्कादायक ! बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह शौचालयात सापडला, शिवडी टीबी रुग्णालयातील प्रकार
SHARES

मुंबईतल्या  शिवडी येथील टीबी रुग्णालयात तब्बल १४ दिवसानंतर रुग्णालयाच्या शौचालयात बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रुग्णालय कोविड सेंटर म्हणून सेवेत आहे. रुग्णालयाच्या या हलगर्जी पणाची दखल पालिकेकडून घेण्यात आली असून  या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

हेही वाचाः-महापारेषणमध्ये ८५०० पदांसाठी भरती, उर्जामंत्री नितिन राऊत यांची घोषणा

शिवडीच्या टीबी रुग्णालयातील शौचालयातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे आली. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने पाहिले असता. एका स्त्रीचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात आढळऊन आला. मृतदेह इतका वाईट स्थितीत आहे की, हे प्रेत स्त्रीचे आहे की पुरुषाचे हे ओळखणेही कठीण झाले आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख तपासण्यासाठी रुग्णालयातील कागदपत्रे (रेकॉर्ड) तपासण्यात आली. त्यावेळी एक बेपत्ता कोविड रुग्ण महिला बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. सूर्यभान यादव नावाची एक २७ वर्षीय रुग्ण ४ ऑक्टोबरपासून वॉर्डातून बेपत्ता होती. हा रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र, अनेकदा टीबीचे रुग्ण रुग्णालयातून पळून जातात. या आधीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे कुणीही गांभीर्य दाखवले नाही. सूर्यभान यादव यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोरेगाव येथील एका डॉक्टरांच्या संदर्भावरुन त्यांना इथे पाठविण्यात आले होते. जाधव यांनी रुग्णालयात दाखल होताना आपल्या निवासाचा पत्ता पुरेसा दिला नव्हता. यादव हे ज्या वॉर्डामध्ये त्या वॉर्डात एकूण ११ रुग्ण होते. सूर्यभान जाधव हे शौचालयात गेल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांचा तेथेच मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते ४ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.

हेही वाचाः-खासगी रुग्णालयात २३६० रुपयांना मिळणार रेमडेसिवीर

रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीपणाची गंभीर दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच, वॉर्डमध्ये काम करणाऱ्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या घटनेप्रकरणी चौकशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खात्याकडून समिती देखील २२ ऑक्टोबर २०२० रोजी गठीत करण्यात आली आहे. उपकार्यकारी आरोग्य अधिकारी (विशेष रुग्णालय) यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या या समितीने तीन ते चार दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय