Advertisement

राज्यात ११ हजार ८८ नवे रुग्ण, दिवसभरात २५६ जणांचा मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत

राज्यात ११ हजार ८८ नवे रुग्ण, दिवसभरात २५६ जणांचा मृत्यू
SHARES

राज्यात आज १० हजार १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.७९ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

हेही वाचाः- Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे

राज्यात आज २५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण २५६ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ११ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ११ मृत्यू ठाणे जिल्हा –७, पालघर -२, कोल्हापूर -१ आणि नाशिक -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. 

हेही वाचाः- संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग, उपचारासाठी जाणार...

केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो. महाराष्ट्रासोबत मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा विचार करता मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्याही मोठी आहे. मुंबई महापालिकने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९१७ रुग्ण सापडले. तर ११५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ४८ रुग्णांची नोंद झाली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा