Advertisement

२४ तासात राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मोठी वाढ


२४ तासात राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मोठी वाढ
SHARES

राज्यात कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यात जरी यश आले असले. तरी धोका अजून टळलेला नाही त्यामुळे नागरिकांनी आजही कोरोनासंदर्भात दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे. असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. रुग्णांच्या संख्येत जरी घट होत असली. तरी कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढत वाढली आहे.

हेही वाचाः- पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार?

राज्यात गेल्या २४ तासात २०६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी ३८११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या २४ तासात ९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हा आकडा ७५ इतका होता. तर आज हा आकडा ९८पर्यंत पोहोचला आहे. आज राज्यातून १७,८३,९०५ जणांचा डिस्चार्ज झाला आहे. यानुसार रिकव्हरी रेट ९४.०६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आजच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दिवसागणिक वाढत आहे, आणि ही चिंता वाढवणारी बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे नियमित पालन करणे गरजेचे आहे.

हेही वाचाः- राज्यभरात हुडहुडी! गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर

नव्या वर्षात कोरोनाचा (Coronavirus) भर ओसरणार, देश कोरोनामुक्त होणार, अशी भविष्यवाणी चर्चेत होती. पण त्यात किती तथ्य आहे? केंद्रीय पातळीवर तयार करण्यात आलेल्या एक्सपर्टस पॅनेलने (Expert Panel) सुपर मॉडेलच्या (Super Model) आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय प्रशासनाची उदासीनता आणि कोरोनाबाबत (Corona) अपेक्षित प्रमाणात चाचण्या करण्यासाठी पुरेशी क्षमता नसल्याने खरी परिस्थिती लक्षातच आलेली नाही. या पॅनेलच्या मते, फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला असेल, पण धोका संपलेला नसेल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा