Advertisement

मुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू

बुधवारी दिवसभरात १८८४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ५४ हजार ०८८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत कोरोनाचे २३६० नवे रुग्ण, ५२ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात बुधवारी कोरोने ४७९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत बुधवारी दिवसभरात २३६० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत बुधवारी दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस

राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२ रुग्ण दगावले आहेत. तर २१ सप्टेंबर रोजी ३६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २२ सप्टेंबर रोजी एकूण ४७ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मुंबईत कोरोनाचे २३६० नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ९० हजार १३८ इतकी झाली आहे. तर बुधवारी दिवसभरात १८८४ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण १ लाख ५४ हजार  ०८८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ रॉयल चॅलेंजर्सची नवी जर्सी

राज्यात आज १९ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून आज २१ हजार २९ नविन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ५६ हजार ३० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६१ लाख ६ हजार ७८७ नमुन्यांपैकी १२ लाख ६३ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.६९ टक्के) आले आहेत. राज्यात  १८ लाख  ७५ हजार ४२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ४५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४७९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६८ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले २१,०२९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४७९ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२३६० (४९), ठाणे- ३५९ (६), ठाणे मनपा-४३२ (१४), नवी  मुंबई मनपा-४८० (११), कल्याण डोंबिवली मनपा-४६९ (४), उल्हासनगर मनपा-७१ (१), भिवंडी निजामपूर मनपा-५६, मीरा भाईंदर मनपा-२४५ (३), पालघर-१९२ (३), वसई-विरार मनपा-२५० (४), रायगड-४६३ (३०), पनवेल मनपा-२८६, नाशिक-५२४ (५), नाशिक मनपा-१२४३ (८), मालेगाव मनपा-६३, अहमदनगर-५९८ (११),अहमदनगर मनपा-२४८ (५), धुळे-६९ (१), धुळे मनपा-६०, जळगाव-३६४ (५), जळगाव मनपा-१५८, नंदूरबार-५९, पुणे- १२६४ (२२), पुणे मनपा-१७९७ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-७८६ (१३), सोलापूर-४५५ (१४), सोलापूर मनपा-५६, सातारा-६०४ (२८), कोल्हापूर-३७५ (५१), कोल्हापूर मनपा-९७ (१२), सांगली-५०८ (३२), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१८२ (४), सिंधुदूर्ग-१०४, रत्नागिरी-७८ (२), औरंगाबाद-११७ (१),औरंगाबाद मनपा-१८९ (१), जालना-१०९ (१), हिंगोली-५५, परभणी-५३ (४), परभणी मनपा-१५ (९), लातूर-२४२ (१), लातूर मनपा-११९ (१), उस्मानाबाद-२८६ (७), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (५), नांदेड मनपा-८० (३), अकोला-४२, अकोला मनपा-२३, अमरावती-११२ (४), अमरावती मनपा-३१० (३), यवतमाळ-३३६, बुलढाणा-१२९, वाशिम-१२८, नागपूर-५११ (११), नागपूर मनपा-१३७३ (४७), वर्धा-१३५ (७), भंडारा-१२२ (२), गोंदिया-३५० (४), चंद्रपूर-१९०, चंद्रपूर मनपा-१७१ (१), गडचिरोली-९८ (१), इतर राज्य- ३६.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा