Advertisement

राज्यात ४ हजार ३५८ रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९४ टक्के


राज्यात ४ हजार ३५८ रुग्ण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ९४ टक्के
SHARES

महाराष्ट्रात आज दिवसभरात ४ हजार ३५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १७ लाख ७४ हजार २५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात ३ हजार ८८० नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला मृत्यूदर २.५७ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

हेही वाचाः- मेसेज येणार तरच कोरोना लस मिळणार- राजेश टोपे

आज राज्यात ३ हजार ८८० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ८४ हजार ७७३ झाली आहे. आज नोंद झालेल्या ६५ मृत्यूंपैकी ४५ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत. १० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर उर्वरित १० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपुरते आहेत. हे १० मृत्यू औरंगाबाद-४, नाशिक-१, नांदेड-१, परभणी-१, पुणे-१, सातारा-१ आणि ठाणे-१ असे आहेत असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १९ लाख ३३ हजार ९५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ८४ हजार ७७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६ हजार ९१४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आजघडीला ६० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा