Advertisement

मुंबईत दिवसभरात ५८६ नवे रुग्ण; ११ जणांचा मृत्यू


मुंबईत दिवसभरात ५८६ नवे रुग्ण; ११ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत रविवारी ५८६ करोनाबाधित आढळले, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्णवाढीचा दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे.

हेही वाचाः- राज्यभरात हुडहुडी! गोंदिया ७.४, मुंबई २० अंशांवर

मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी झाला आहे. दररोज सातशे ते आठशेच्या आत रुग्ण आढळत असून, एकूण रुग्णसंख्या २ लाख ८६ हजाराच्या पुढे गेली. रविवारी दिवसभरात २९८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ लाख ६७ हजार म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ७ हजार ९९६ रुग्ण उपचाराधीन आहेत. रुग्णदुपटीचा कालावधी ३५४ दिवसांवर गेला आहे. आतापर्यंत मुंबईत २१ लाख ९३ हजार चाचण्या करण्यात आल्या. राज्यात गेल्या २४ तासांत ३,८११ करोना रुग्णांची नोंद झाली असून, ९८ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या १९ लाखांच्या जवळ आली असून, ४८,७४६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला.

मुंबईतील ५५ हजारांहून अधिक इमारती टाळेमुक्त

एकीकडे मुंबईतील करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे निर्बंध हटवून तब्बल ५५ हजारांहून अधिक इमारती टाळेमुक्त करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्याने आजघडीला केवळ ३,४९१ इमारती टाळेबंद आहेत. तर अवघ्या २६० झोपडय़ा आणि चाळींवर निर्बंध आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा