Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

धारावीमध्ये रुग्ण संख्येत 'इतकी' घट

कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेला धारावी पॅटर्नचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून येत आहे.

धारावीमध्ये रुग्ण संख्येत 'इतकी' घट
SHARES

गतवर्षी कोरोनानं हातपाय पसरत मुंबईत प्रसिद्ध धारावी झोपडपट्टीला हॉटस्पॉट बनवलं होतं. मात्र, त्यावेळी महापालिका प्रशासनानं उपाययोजनांची कोणतीही कमतरता न ठेवता धारावीला हॉटस्पॉटमधून बाहेर काढलं. यावेळी चर्चेत राहिला तो म्हणजे धारावी पॅटर्न. कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेला धारावी पॅटर्नचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून येत आहे.

गेले काही दिवस धारावीतील कोरोना बाधितांच्या संख्येत वेगानं वाढ होत होती. मात्र, अनेक उपाययोजनांमुळं अखेर आठवड्याभरात रुग्णसंख्येत घट दिसून आली. सोमवारी धारावीत २५ बाधित रुग्ण सापडले. ऑक्टोबर २०२० नंतर धारावीत एक अंकी रुग्णांची नोंद होत होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये धारावीत रुग्ण वाढ दिसून आल्यानंतर जी उत्तर विभागानं तातडीनं पावलं उचलत मोबाइल चाचणी व्हॅन, फिव्हर क्लिनिक, बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला. या मोहिमेचा प्रभाव आता दिसून येत आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येत मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी घट पहायला  मिळाली. मुंबईत रविवारी ५५४२, शनिवारी ५८८८, तर शुक्रवारी ७२२१ रुग्णांचे निदान झाले होते. गेल्या २४ तासांत मुंबईत ३ हजार ८७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रविावारच्या तूलनेत हा आकडा १६६६ इतका कमी आहे.हेही वाचा -

सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट, ७१ हजार बरे

लशींचे दर कमी करा, केंद्राची सीरम, भारत बायोटेककडे मागणी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा